औरंगाबाद :रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे. त्यामुळेवेगवेगळ्या रक्तविकारांवर आणि जनुकीय आजारांवर, बदलणाऱ्या निदान तंत्रांवर व विविध उपचार पद्धतींवर फिजिशियन असोसिएशन आॅफ औरंगाबाद, औरंगाबाद आॅबस्टेट्रिक अॅण्ड गायनाकॉलॉजीकल सोसायटी आणि कमलनयन बजाज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडास्तरीय दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे शनिवारी (दि.३०) उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी सी. पी. त्रिपाठी, लंडन येथील डॉ. आशुतोष वेचलेकर, डॉ. रोशन कोलाह, डॉ. सुमित गुजराल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.परिषदेस डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. व्यंकटेश एकबोटे, डॉ. अलका एकबोटे, डॉ. प्रांजळ कुलकर्णी, डॉ. गजानन पदमवार, फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या शहर शाखेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा देशमुख, सचिव डॉ. मनीषा काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. आनंददीप अग्रवाल, डॉ. सुमित भट, डॉ. हेमंत कोंकडकर, डॉ. राजेंद्र खडके, डॉ. रवींद्र पटवाडकर, डॉ. तुषार मुळे, डॉ. राजेश सावजी, डॉ. सी. पी. भाले, डॉ. शुभांगी शेटकर आदी उपस्थित होते.डॉ. समीर मेलेनकरी, डॉ. अभिजित गणपुळे यांनी रक्ताच्या कर्करोगाच्या उपचाराविषयी, डॉ. वेचलेकर यांनी विविध रक्तविकारांवर, डॉ. कोलाह यांनी थॅलेसेमियासारखे आजार कशा प्रकारे टाळता येतील, यासंदर्भात मार्गदर्शन केले.ब्लड कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावररक्ताचा कर्करोग बरा करण्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे. पुरुष आणि महिलांमध्ये आढळणाºया कर्करोगात रक्ताचा कर्करोग हा दुसºया क्रमाकांवर आहे. टार्गेटेड थेरपीद्वारे केवळ खराब पेशी नष्ट केल्या जातात. लहान मुले असो की मोठी व्यक्ती, रक्ताचा कर्करोग झालेले ७० टक्के रुग्ण बरे होतात, असे डॉ. व्यंकटेश एकबोटे यांनी सांगितले.
आजारांचे नव्हे, निदानाचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:09 PM
:रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे.
ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे उद््घाटन