शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

जलकुंभांची स्थिती विदारक

By admin | Published: July 08, 2016 11:47 PM

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छतेअभावी अनेक टाक्यांमध्ये अक्षरश: कचरा आणि घाण साचली आहे. बऱ्याच टाक्यांची वरची झाकणेच गायब झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ या टाक्यांमध्ये पडते आहे. या सर्व कारणांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. लोकमतने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही विदारक परिस्थिती समोर आली. संपूर्ण शहराला पिण्यासाठी मनपाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता स्वतंत्र जलवाहिन्यांद्वारे जायकवाडी धरणातून आधी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येते. या ठिकाणी विविध प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी शहरातील जलकुंभांमध्ये पोहोचविले जाते. मात्र यानंतर हे पाणी शुद्धच राहत असल्याचा समज चुकीचा असल्याची बाब गुरुवारी समोर आली. लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील क्रांतीचौक, कोटला कॉलनी, गिरिजादेवी हाऊसिंग सोसायटी, दिल्लीगेट, ज्युबली पार्क, रेल्वेस्टेशन, पुंडलिकनगर, सेव्हन हिल, ज्योतीनगर, शहागंज, सिडको एन- ७ यांसह शहरातील विविध जलकुंभांची पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बहुतेक जलकुंभांवरील लोखंडी झाकण गायब झाले आहेत. त्यामुळे हवेतील धूळ, कचरा तसेच पावसाचे पाणी थेट या जलकुंभात जात आहेत. बऱ्याच ठिकाणी तळाला माती आणि कचरा साचलेला आहे. तर काही ठिकाणी शेवाळही आले आहेत. नियमानुसार जलकुंभांची ठराविकपणे स्वच्छता करणे अपेक्षित आहे. मात्र मनपाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या वॉटर युटिलिटी कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. क्रांतीचौक, कोटला कॉलनी, शहागंज, दिल्लीगेट, ज्युबली पार्क आदी ठिकाणी जलकुंभांवर दर्शविलेली स्वच्छतेची तारीख केव्हाच निघून गेलेली आहे. परंतु त्यानंतरही स्वच्छता झालेली नसल्याचे आढळून आले. फारोळा येथून शहरात शुद्ध पाणी येत असले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचताना पुन्हा दूषित होत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतेच्या तारखा नावालाचप्रत्येक जलकुंभाची सहा महिन्यातून एकदा स्वच्छता होणे अपेक्षित आहे. स्वच्छता कधी केली गेली आणि पुढची स्वच्छता कधी करणार याच्या तारखा जलकुंभावर नोंदविणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच ठिकाणी जलकुंभांवर या तारखांची नोंदच नसल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी नोंदी असल्या तरी स्वच्छता करण्याची तारीख कधीच निघून गेलेली असली तरी अद्याप स्वच्छता झालेली नसल्याचे दिसून आले.