वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीची वेळ निश्चित नाही. त्यामुळे नागरिकांकडून जमा झालेला कचरा सर्रासपणे खुल्या जागेवर फेकला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सिडको वाळूज महानगराची झपाट्याने वाढ होत आहे. अनेक नवीन वसाहती अस्तित्वात आल्याने लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सिडकोने कचरा संकलनाचे काम खाजगी ठेकेदाराला दिले आहे. ठेकेदाराकडून तीन दिवसांआड कचरा संकलित केला जातो. शिवाय कचरा संकलनासाठी लावलेल्या घंटागाडीची वेळ निश्चित नाही. वेळेवर घंटागाडी येत नसल्याने घरात कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिक रात्रीच्या वेळी बिंदास्तपणे खुल्या जागेवर कचरा आनून टाकत आहेत. सिडको जलकुंभ रस्ता, तीसगाव-वडगाव रस्त्यावरील खुल्या जागेचा, तसेच सिडको नाल्याचा कचरा फेकण्यासाठी सर्रासपणे वापर केला जात आहे.