बीड : तालुक्यातील खडकी (घाट) येथील श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात सहा महिन्यांच्या आत कारवाई करावी, सदस्यांच्या यादीसंदर्भातील वाद तातडीने निकाली काढावेत आणि मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्याखालील प्रकरण नऊ महिन्यांच्या आत निकाली काढावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लातूरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांना दिले आहेत. श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेचा बऱ्यांच दिवसांपासून वाद आहे. हे प्रकरण २००९ पासून न्यायप्रविष्ठ आहे. श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेने वेळेत हिशेब दिले नाहीत म्हणून लातूर सहा. धर्मदाय आयुक्तांनी कार्यकारिणीचे नऊ पैकी सहा सदस्य चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते. दरम्यानच्या कालावधीत, औरंगाबाद खंडपीठात संस्थेचे सचिव आर.एच. भोसले यांनी याचिका दाखल करत कार्यकारिणीवर गदा येत असल्याने म्हटले होते. त्यावर सुनावणी करत हा निवडणुकीचा वाद नसून सदस्य निवडीचा वाद आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपिठाने श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या निवडणुका घेण्या संदर्भात सहा महिन्यांच्या आत कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. सदस्यांच्या यादी संदर्भातील वाद तातडीने निकाली काढावीत तसेच मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्याखालील प्रकरण नऊ महिन्यांच्या आत निकाली काढावेत असे आदेश न्या. ए.एम. बदर व एस.व्ही. गंगापुरवाला यांनी नुकतेच दिले आहेत. दरम्यान, श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेवर प्रशासक म्हणून अॅड. प्रशांत माने यांची नियुक्ती केली नसून काही व्यक्ती दिशाभूल करणाच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप संस्थेचे सचिव आर.एच. भोसले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
बंकटस्वामी शिक्षण संस्थेचा वाद नऊ महिन्यांत निकाली काढा
By admin | Published: August 11, 2014 12:15 AM