तालुका विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ वैजापूर व ग्रामपंचायत खंडाळा यांच्यामार्फत खंडाळ्यात शुक्रवारी आयोजित मोफत कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रमाला न्यायाधीश पी. आर. दांडेकर, न्यायाधीश युनूस तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲड. प्रमोद जगताप, ॲड. प्रताप निंबाळकर, ॲड. सईद अली, ॲड. योगेश थावरे, ॲड. प्रफुल्ल पोंदे, ॲड. डी. टी. डगळे, ॲड. संदीप डोंगरे यांनी विविध कायद्यांबाबत माहिती सांगितली. महिला न्यायाधीश पी. आर. दांडेकर यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने असलेले कायदे व तरतुदींचा शिबिरात आढावा घेतला. ॲड. डगळे यांनी वरिष्ठांना सन्मानाने वागणूक देण्याविषयी कुटुंबातील व्यक्तींनी भूमिका घेऊन त्यांची आर्थिक स्थिती व आरोग्यविषयक काळजी घ्यावी, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सोपान पवार यांनी तर आभार रवि पाटणी यांनी मानले.
फोटो कॅप्शन : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे आयोजित मोफत कायदेविषयक शिबिरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोईउद्दीन एम. ए. यांनी मार्गदर्शन केले.
170921\save_20210917_175354~2.jpg
फोटो