शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 10:37 AM

वाळूज एमआयडीसीतील या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचे बळी गेले. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : इन्स्पेक्टर राज संपविण्याच्या राज्य सरकारच्या व्यवसाय सुलभीकरण धोरणामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयासह कामगार विभागाचे अधिकार काढून घेण्यात आले. २०१६ मध्ये लागू झालेल्या या धोरणामुळे औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने सनशाइन इंटरप्रायजेस कंपनीसारख्या जळीत कांडासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते.

वाळूज एमआयडीसीतील या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचे बळी गेले. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. फॅक्टरी ॲक्ट १९४८ नुसार २० अथवा त्यापेक्षा अधिक कामगार एकाच पाळीत काम करीत असलेल्या कारखान्याची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, रासायनिक अथवा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांचा वापर करून उत्पादनाच्या ठिकाणी २० पेक्षा कमी कामगार असले तरीही अशा कारखान्याची नोंद या विभागाकडे करणे बंधनकारक आहे. छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतींमधील सुमारे साडेतीन हजारांपैकी केवळ १ हजार ३३६ कारखान्यांचीच नोंदणी औद्योगिक सुरक्षा विभागाकडे आहे.  

औद्योगिक सुरक्षा विभागाचा वचक संपला-    कोणत्याही कारखान्याला अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे फॅक्टरी इन्स्पेक्टरचे अधिकार काढून घेण्याचे धोरण २०१६ पासून राज्यात लागू करण्यात आले. -    कोणत्या कंपनीची तपासणी कधी करायची, याबाबतचे शेड्युल्ड मध्यवर्ती केंद्रीय निरीक्षण प्रणाली अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले जाते. सोबतच अधिकारी तपासणीसाठी कंपनीत येणार असल्याचे कारखानदाराला कळविण्यात येते. -    या धोरणामुळे औद्योगिक सुरक्षा विभागाचा वचक संपला आहे.   

कंपनीच्या वेबसाइटवर विदेशी संचालक आणि सीईओ - -    सनशाइन इंटरप्रायजेस कंपनीच्या वेबसाइटवर एक्सपर्ट टीम म्हणून आणि कंपनीचे संचालक म्हणून विदेशी व्यक्तींच्या नावासह छायाचित्र दर्शविण्यात आले आहे. यात पीटर पर्स नावाच्या व्यक्तीच्या छायाचित्राखाली त्याचे पद कंपनीचा डायरेक्टर असे दर्शविण्यात आले. -    तरुणीच्या छायाचित्राखाली सारा स्वीफ्ट असे नाव आणि एक्झिक्युटिव्ह असे तिचे पद दाखविण्यात आले. ऑलिया स्कॉट ही प्रोग्रामर तर डॅनियल जेम्स हा कंपनीचा सीईओ असल्याचे संकेतस्थळावर दर्शविण्यात आले आहे.-     सन २००२ पासून कंपनी कार्यरत असल्याचे दाखवून हातमोजे आणि अन्य औद्योगिक सुरक्षा साधनांची छायाचित्रांसह माहिती दर्शविण्यात आली आहे. 

कंपनीचे मालक व ठेकेदार यांना पोलिस कोठडीसनशाइन इंटरप्रायजेस या कंपनीचा मालक साबेरखान शब्बीरखान पठाण व ठेकेदार मोहम्मद हसिनोमुद्दीन शेख या दोघांना ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. गुणारी यांनी सोमवारी दिले.   

टॅग्स :fireआगWaluj MIDCवाळूज एमआयडीसीWalujवाळूज