औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीत घाटी रुग्णालयाचा गाडा सुरळीतपणे हाकण्यासाठी ५९.७८ कोटींची मागणी २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या खर्चासाठी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १५.९८ कोटींचे अनुदान अर्थसंकल्पातून मंजूर झाले. घाटीतील पुरवठादारांची १९ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपयांची देणी थकली आहेत. त्यामुळे पुरवठ्यात अडचणी येत असून, ३० कोटी ८६ लाख ९० हजार रुपयांची पुरवणी मागणी घाटीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे केली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
घाटीतील पुरवठादारांची १९ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपयांची देणी थकली असल्याने ते न्यायालयीन कार्यवाही करणे, पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवणे अशा संबंधित पत्रव्यवहार करीत आहे. रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आॅक्सिजन, औषधी, सर्जिकल साहित्य, रसायने, रुग्ण कापड, सुरक्षारक्षक, स्वच्छतेची कामे, किरकोळ वस्तू खरेदी, विविध यंत्रसामग्रीची वार्षिक देखभाल दुरुस्तीची प्रलंबित देयके अडचणीची ठरत आहेत. यासंबंधी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला पत्रव्यवहार करून पुरवणी मागणीचा निधी तात्काळ मिळवण्यासाठी शासनाकडे कार्यवाहीची मागणी केल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले.
नॉन कोविड रुग्णसेवा अडचणीत : घाटीत औषधांच्या चिठ्ठ्यांचा सपाटा सुरूच, नॉन कोविड रुग्णसेवा अडचणीत यासंदर्भात ‘लोकमत’ने घाटीतील रुग्णसेवेच्या अडचणी समोर आणल्या. कोरोनासाठी विविध स्तरावरून निधी मिळत आहे. मात्र, घाटीत कोरोनापेक्षा दुप्पट संख्येने नॉन कोविड रुग्ण आजही भरती आहेत. त्यांच्या उपचारातील अडचणी सोडवण्यासाठी घाटीला राज्य शासनाकडून अनुदान मिळाल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत, असे घाटीतील जाणकारांचे म्हणणे आहे.
गरजेच्या अनुदानातील तफावतकाम : २०-२१ मागणी २०-२१ अनुदान मंजूर प्रलंबित देयके पुरवणी मागणी जून २०कंत्राटी सेवा : ३,६७,८७,००० १,१०,२५,००० १,३६,७९,००० ६,९६,९८,०००कार्यालयीन खर्च ३,५९,५७,००० १,४७,१८००० ४,२८,१४००० ४,०३,४७,०००संगणक खर्च : १५,००,००० ४,१२,००० ३४,४९,००० ३५,३८०००आहार खर्च : २५५३७००० १०९४३००० १,१२,७९००० १,२३,८०,०००सामग्री व पुरवठा ३१,८२,२५,००० १०,००,००,००० ९,९३,३२,००० १४,६१,३२,०००यंत्र व साधनसामग्री ४४,८२,००० १२५८००० ५४४९००० ४१९१०००यंत्रसामग्री परिरक्षण १७५३२७००० २१५१६००० १९५६१००० ३२४०४०००