खुलताबाद तालुक्यातील सर्वात जुनी शाळा म्हणून टाकळी राजेरायच्या जिल्हा परिषद शाळेचा समावेश होतो. येथील चार वर्गखोल्यांचे काम दहा ते बारा वर्षांपूर्वीच झाले होते. मात्र, या खोल्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. खिडक्या, भिंती, फरशी या वस्तूंची मोडतोड झाली आहे. शाळा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेकडे वर्गखोल्या दुरूस्तीचा प्रस्ताव दिला गेला. मागील वर्षी यापैकी एका वर्गखोलीचे काम करण्यात आले. परंतु त्या खोलीचे सिलींगचे प्लास्टर आपोआप पडू लागले आहे. त्यामुळे हे कामदेखील निकृष्ट झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. शाळेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असून, शाळेची संरक्षक भिंत दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
----
फोटो : टाकळी राजेराय येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीला पडलेले भगदाड.