वाळूज महानगर: पर्यावरण संवर्धनासाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून, ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांत वृक्ष लागवड करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शनिवारी कमळापूर भागातील रहिवाशांना ३ हजार रोपांचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीतर्फे कमळापूर भागातील रहिवाशांना आंबा, पिंपळ, पेरु, अशोक, वड आदी विविध जातींची जवळपास ३ हजार रोपे देण्यात आली. याची लागवड गावातील मुख्य रस्ते, मोकळी जागा तसेच नागरिकांच्या घरासमोर केली जाणार आहे.
यावेळी सरपंच सोनू लोहकरे, उपसरपंच मंगल निळ, माजी उपसरपंच नजीरखान पठाण, अमोल लोहकरे, प्रविण दुबिले, पंडित पनाड, सूर्यभान काजळे, सुनिल वाघमारे आदी उपस्थित होते.