:जानकीदेवी देवी फाऊंडेशन व पोलिस कम्युनिटी पथकाचा पुढाकार
वाळूज महानगर : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या पंढरपुरातील २५० कुटुंबांना जानकीदेवी बजाज सेवाभावी संस्था व पोलीस कम्युनिटी पथकाच्या पुढाकाराने शनिवारी (दि.२९) किराणा किटचे वाटप करण्यात आले.
औरंगाबाद शहरात पोलिस आयुक्तालयातर्फे सुरू केलेल्या कम्युनिटी सेंटरच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थाच्यावतीने अन्न-धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात येते. वाळूज उद्योगनगरीत अनेक गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात शनिवारी महिलांना किराणा साहित्याची किट देण्यात आली. या प्रसंगी जानकीदेवी बजाज संस्थेच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अनिता देशमुख, सुवर्णा इंगळे, ऐश्वर्या मोहिते, दामिनी पथकाच्या पोना. निर्मला निंभोरे, मपोकॉ. प्रियंका सारसांडे, सहदेव साबळे, सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा अख्तर आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जानकीदेवी फाऊंडेशन व पोलिस कम्युनिटी पथकाच्या पुढाकाराने गरीब कुटुंबातील महिलांना किराणा साहित्याची किट देण्यात आली.
-----------------------
बजाज गेट-वाल्मी रस्त्यावर जलवाहिनी फुटली
वाळूज महानगर : बजाज गेट- वाल्मी रस्त्यावरील एमआयडीसीची जलवाहिनी शनिवारी (दि. २९) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास फुटून पाण्याचे उंचच-उंच कारंजे उडून हजारो लिटर पाणी वाहुन गेले.
एमआयडीसी प्रशासनाकडून चिकलठाणा औद्योगिक परिसर व नागरी वसाहतीत पाणी पुरवठा करण्यासाठी बजाजगेटजवळील पंप स्टेशन येथून जलवाहिनी टाकलेली आहे. शनिवारी सांयकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे कारंजे जवळपास २५ ते ३० फुटांपर्यंत उडत होते. ही माहिती मिळताच कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत सरग यांनी तात्काळ पाणी पुरवठा करणारे पंप बंद केले. यानंतर उअपभियंता सरग व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठुन पाहणी केली. ही जलवाहिनी ७०० मिली लिटर व्यासाची आहे. एमआयडीसीच्या कर्मचाऱ्याकडून जलवाहिनीतील पाणी संपल्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर चिकलठाण परिसरातही पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येईल, असे सरग यांनी सांगितले.
फोटो क्रमांक- बजाज गेट- वाल्मी रस्त्यावरील एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे उंचच-उंच कारंजे उडून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.
--------------------