चितेपिंपळगाव : कृषी विभागाच्या वतीने मौजे मंगरूळ आणि गारखेडा नंबर २ येथे जागतिक मृदा दिनानिमित्त बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मौजे मंगरूळ आणि गारखेडा नंबर २ येथे ७५७ शेतकºयांना मान्यवरांच्या हस्ते जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.
मौजे मंगरूळ येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सिकंदर खिल्लारे हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कैलास उकिर्डे, तालुका कृषी अधिकारी जाधव, जिल्हा माती व पाणी तपासणी प्रयोगशाळा प्रमुख कायंदे, मंडळ कृषी अधिकारी काळे, बिडीओ, कृषी विस्तार अधिकारी व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.
जमीन आरोग्य पत्रिकानुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याबाबत डॉ. किशोर झाडे यांनी सविस्तर माहिती दिली. पीक फेरपालट, हिरवळीची खते सेंद्रिय खते, शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, निंबोळी पेंड यांच्या वापरातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होणार आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीत मोसंबी, डाळिंब फळबाग व्यवस्थापन, चारा पीक व्यवस्थापन, झोला निर्मिती, मुर्घास याविषयी शेतकºयांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी काळे यांनी केले.