दावरवाडी : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ग्रीन फाउंडेशन सेवाभावी संस्थेकडून व पंचक्रोशीतील गावात जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या सचिव विनिता भंडारी यांच्यामार्फत गरजवंतांना दोन हजार कापडी मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. या संस्थेने गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, महिला सक्षमीकरणासाठी, आरोग्य, शिक्षण सेवा यावर भर देण्यात येत आहे. यावेळी सरपंच शामराव तांगडे, उपसरपंच राजेंद्र वाघमोडे, बी.टी तांगडे, बालाप्रसाद भंडारी, अक्षय भंडारी, मोहनराव जगताप, प्रवीण खांडे, नानासाहेब एडके, राजू नन्नवरे, माजी सरपंच प्रकाश देशमुख, जीवन जगताप, केंद्रप्रमुख राम तांगडे, चंद्रकांत तांगडे, संजय हाके, गणेश गिरी, सागर एडके, गोविंद चित्रे, शंतनु जगताप, बाबासाहेब हाके आदी उपस्थित होते.
-- छाया : दावरवाडीत नागरिकांना मास्क देताना ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी.
070521\2745img_20210507_090241_1.jpg
दावरवाडी