शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची विष पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:46 PM

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील ऊर्फ दादा (वय ७८) यांनी सोमवारी (दि. २५) दुपारी समर्थनगरातील निवासस्थानी विष पिऊन आत्महत्या के ली. या घटनेने खळबळ उडाली असून, सहकार आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली. पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, आत्महत्येसाठी अ‍ॅड. सदाशिव गायके आणि नाना पाटील हे जबाबदार असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रक रणी रात्री उशिरा गायके आणि नाना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

ठळक मुद्देराहत्या घरात उचलले टोकाचे पाऊल : सहकार, राजकीय क्षेत्रात खळबळ

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील ऊर्फ दादा (वय ७८) यांनी सोमवारी (दि. २५) दुपारी समर्थनगरातील निवासस्थानी विष पिऊन आत्महत्या के ली. या घटनेने खळबळ उडाली असून, सहकार आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली. पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, आत्महत्येसाठी अ‍ॅड. सदाशिव गायके आणि नाना पाटील हे जबाबदार असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रक रणी रात्री उशिरा गायके आणि नाना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि अ‍ॅड. गायके यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे. गायके यांनी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी केलेल्या असून, त्यावरून गुन्हे दाखल आहेत. जिल्हा बँकेतील सर्वसाधारण सभेत गायके यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाची सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होती. नेहमीप्रमाणे सुरेश पाटील, रायभान मदगे आणि दयाराम साळुंके हे तिघे सुनावणीसाठी सकाळी ११ वाजता न्यायालयात गेले होते. ते न्यायालयात असताना सुरेश पाटील यांना वेदांतनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी फोन करून तुमच्याविरुद्ध सदाशिव गायके यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदविल्याचे सांगितले. न्यायालयीन कामकाज आटोपून सुरेश पाटील पावणेबारा वाजेच्या सुमारास समर्थनगरातील निवासस्थानी गेले. ‘खूप थकलो, मी पडतोय,’ असे पत्नीला सांगून ते त्यांच्या रूममध्ये गेले आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी रूममध्ये विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.चौकटदरवाजा तोडून काढले बाहेरसुरेश पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार नितीन पाटील, नातू निशांत यांनी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास जेवण केले. आजोबांनी जेवण केले नसल्याचे समजल्याने निशांत त्यांना उठविण्यासाठी गेला. दरवाजा वाजविला. मोबाईल कॉल केला. रूममधील लॅण्डलाईन फोन करूनही त्यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नितीन यांच्या सांगण्यावरून निशांतने रूमच्या मागील खिडकीतून आत डोकावून पाहिले, तेव्हा आजोबा बेडवर पडलेले दिसले. नितीन पाटील यांनीही खिडकीतून पाहिले व नंतर दरवाजा तोडला. बेशुद्धावस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पाटील यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.खोलीत आढळली सुसाईड नोट, विषाची बाटलीसुरेश पाटील यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नितीन पाटील, निशांत पाटील आणि नातेवाईक लगेच सुरेश पाटील यांना घेऊन घरी आले. त्यानंतर त्यांना त्या खोलीत विषाची बाटली आणि सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटमध्ये सदाशिव गायके आणि नाना पाटील यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुरेश पाटील यांनी लिहून ठेवल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली. या चिठ्ठीवर ११ वाजून ५२ मिनिटे असा वेळही टाकला आहे. पाटील यांचे घाटीत शवविच्छेदन करण्यात आले.-------कोट...सदाशिव गायके, नाना पाटील पोलिसांच्या ताब्यात - पोलीस उपायुक्त खाटमोडे पाटीलपोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात पाटील यांचा मृत्यू विष प्याल्याने झाल्याचे समोर आले. त्यांच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी नमूद केले की, २० वर्षांत सदाशिव गायके आणि नाना पाटील यांनी विविध केसेस करून त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहे. त्यांच्याशिवाय कोणालाही जबाबदार धरू नये, असे स्पष्टपणे लिहिले आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चिठ्ठीत नावे असलेल्या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.-----गायके यांची अपहरणाची तक्रारअ‍ॅड. सदाशिव गायके यांनी सोमवारी सकाळी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कारमधून आलेल्या दोन अनोळखींनी कोकणवाडी येथे आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सुरेश पाटील, नितीन पाटील आणि जयराम साळुंके विरोधात तक्रार करतो का, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून बळजबरीने कारमधून बसविण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला.------------वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धावसुरेश पाटील यांनी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याचे कळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त एच. एस. भापकर, सहायक आयुक्त डॉॅ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक , उपनिरीक्षक कोमल शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नितीन पाटील यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली.---फॉरेन्सिक पथकाने गोळा केले नमुनेपोलिसांच्या न्याय सहायक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी सुरेश पाटील यांनी ज्या खोलीत आत्महत्या केली त्या खोलीतील विषाची बाटली, सुसाईड नोट जप्त केली.-------------- 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस