हिंगोली : लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाच्या न्याय्य हक्क मागणीसाठी मातंग आरक्षणासाठी जिल्हा कचेरीवर १७ फेब्रुवारी रोजी आरक्षण मोर्चा काढला. लहुजी सेनेच्या वतीने अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, तसेच तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर नोकरीमध्ये व शिक्षणामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अनुसूचित जातीतील उपेक्षित राहिलेल्या मातंग समाजाला व इतर जातींना सामाजिक न्याय देण्यात यावा, महाराष्ट्र राज्याच्या वार्षिक अंदाजपत्रकात अनुसूचित जाती योजनेसाठी असलेल्या आर्थिक तरतुदीचे जातीनिहाय वाटप करावे, तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा अमरावती शहरात बसविण्यात यावा, त्याचबरोबर ३१ जुलै २०१४ ते १४ आॅगस्ट २०१४ या कालावधीत उस्मानाबाद, पुणे, नांदेड आदी ठिकाणी उपोषणास बसलेल्या लहुसैनिक व महिलांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. दिलेल्या निवेदनावर महेश भिसे, भास्कर शिंदे, सुनील गायकवाड, वामन मगर, शिवाजी जोगदंड, बालाजी सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हा कचेरीवर आरक्षण मोर्चा
By admin | Published: February 17, 2016 10:49 PM