सिल्लोड : तालुक्यातील अजिंठा येथील ऐतिहासिक गांधी चौकात मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त (१७ सप्टेंबर) शासकीय ध्वजारोहण सुरू करण्याच्या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. मी रस्त्यावर ध्वजारोहण करण्याची परवानगी देऊ शकत नाही, असे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यास नकार दर्शविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अजिंठाच्या ऐतिहासिक गांधी चौकात ग्रामपंचायतकडून १९५२ पासून १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. ग्रामपंचायत सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होतो; मात्र मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त या चौकात शासकीय ध्वजारोहण आजपर्यंत झालेले नाही. येत्या १७ सप्टेंबरपासून शासकीय ध्वजारोहण सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे काही दिवसापूर्वी नागरिकांनी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ध्वजारोहण करण्यास परवानगी नाकारली आहे.
-----
मग अन्य शासकीय ध्वजारोहन बेकायदेशीर समजायचे का
निजाम काळातही भारतीय ध्वज फडकावणे बेकायदेशीर होते. आजही ध्वजारोहणास परवानगी नाकारून त्यात भर घातली जात आहे. ध्वजारोहनासारख्या राष्ट्रकार्यास परवानगी नाकारणे हे योग्य नाही. रस्त्यावर परवानगी नाही असे जिल्हाधिकारी यांचे मत असेल तर मग १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला याच ठिकाणी होणारे शासकीय ध्वजारोहन बेकायदेशीर समजायचे का, असा प्रश्न शिवप्रतिष्ठान संस्थेचे संदीप मानकर, इतिहास अभ्यासक विजय पगारे यांनी उपस्थित केला आहे.
----
ध्वजारोहन करण्याबाबत आमच्याकडे मागणी आली होती. पण मी रस्त्यावर ध्वजारोहन करण्यास परवानगी देऊ शकत नाही. आमच्या विभागाने ते नाकारले आहे.
- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी.
----
प्रशासनाला शासन निर्णयाचा विसर
सामान्य प्रशासन विभागाने ३० ऑगस्ट २०१३ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार ध्वज संहितेच्या कलम एक २.२ नुसार जनतेतील कोणतीही व्यक्ती, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगाच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा ध्वजारोहण करता येते. या शासन आदेशाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
090921\img_20210909_152135.jpg
- क्याप्शन
- अजिंठा येथील हाच तो गांधी चौकातील स्तंभ ...येथे 15 ओगस्ट, 26 जानेवारीला झेंडा फडकावला जातो.....