शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

जिल्हा रुग्णालयच ‘आजारी’!

By admin | Published: June 01, 2017 12:29 AM

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात सध्या वर्ग एक व तीनच्या जागा रिक्त आहेत.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील जिल्हा रुग्णालयात सध्या वर्ग एक व तीनच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ओपीडीसह अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांवर उपचार करताना उपलब्ध डॉक्टरांना अडचणी येत आहेत. अनेकवेळा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नातेवाईकांच्या संतापाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्हा रुग्णालयात १२ वॉर्ड आहेत. तर ३२० खाट आहेत. प्रत्यक्षात अ‍ॅडमिट राहणाऱ्या रुग्णांची संख्या ६०० ते ७०० असते. त्यामुळे खाट अपुरे पडतात. परिणामी रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते. अनेकवेळा तर खाट उपलब्ध नसल्याने गंभीर आजारातील रुग्णांनाही फरशीवर झोपविण्याची वेळ आली आहे.तसेच या रुग्णालयात दररोज दोन हजार बाह्य रुग्णांची तपासणी होते. सकाळी सात वाजल्यापासूनच रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण गर्दी करू लागतात. पाहता पाहता रुग्णालय फुल्ल होते. प्रत्येक विभागाच्या समोर रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात. डॉक्टरही रुग्णांची गर्दी पाहून लवकर लवकर तपासणी करून त्यांना मोकळे करतात. अनेकवेळा गंभीर आजारातील रुग्णांकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे रुग्ण संतापून डॉक्टरांसोबत वाद घालत असल्याचे अनुभव रुग्ण सांगतात. जिल्हा रुग्णालयात वर्गच्या अधिकाऱ्यांची संख्या १९ आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ चारच कार्यरत आहेत. उर्वरित १५ जागा रिक्त आहेत. या चारपैकी एक जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ व त्वचा रोग तज्ज्ञ यांचा समावेश आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोगले हे जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत तर यातील डॉ.पाटील यांची बदली होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीए व आरएमओ हे दोन्ही अधिकारी प्रशासकीय कामांमध्येच व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना रुग्ण तपासण्यास वेळ मिळत नाही. रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचा भार सध्या वर्ग दोनच्या डॉक्टरांसह नर्सवर असल्याचे सांगण्यात येत आहे.