जालना : शालेय शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या शाळा सिद्धि उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल २२७० शाळांनी २८ फेब्रुवारी अंतिम मुदतीत आॅनलाईन माहिती भरल्याने जिल्हा स्वयंमूल्यमापनात राज्यात दुसरा क्रमांकावर आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात डिजीटल क्लास रूम, ज्ञानरचनावाद, शैक्षणीक साहित्य निर्मीती, नवोपक्रम, प्रशिक्षण, प्रदर्शन सादरीकरण, नाविण्य उपक्रम, अध्ययन, अध्यापन, कृतीशील अध्ययन पध्दती यासह संगणक प्रणालीच्या माध्यमातून शाळा शिक्षण विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरून घेणे आदी उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यातच नव्याने शाळा सिध्दी उप्रकमांची शिक्षण विभागाकडून भर घातली आहे. शाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा, मनुष्यबळ, अध्ययन अध्यापक, माहितीची उपलब्धता कशी आहे. याची तपासणी शाळेचे क्रीडागण, उपक्रमे, साहित्य, वर्गखोल्या,वीज व विद्युत उपकरण, ग्रथालय, प्रयोगशाळा, संगणक उतरता रस्ता, मध्यान्ह भोजन, स्वयंपाक खोली, त्यातील भांडी, पेयजल व्यवस्था, विद्यार्थ्यांना हात धुण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी मानकाच्या आधारे स्वयंमुल्यमापनाच्या माध्यमातून शाळेची सविस्तर माहिती सादर करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्दश होते. यात जालना जिल्ह्यातील २३६२ शाळापैकी २२७० शाळांनी आपली अपडेट माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आॅनलाईन पाठविली आल्याने राज्यातून जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. (प्रतिनिधी)
शाळा सिद्धी उपक्रमात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
By admin | Published: March 05, 2017 12:24 AM