औरंगाबाद : मराठवाड्यातील भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire) यांनी टीका केली. यानंतर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी खैरे यांना जोरदार प्रत्युत्तर देत ते केंद्रीय मंत्री डॉ. कराड ( DR. Bhagvat Karad ) यांची कधीच बरोबरी करू शकणार नाहीत अशी टीका केली. खैरे यांनी शहर आणि जिल्ह्याची वाताहत केली असा टोला लगावत असताना त्यांनी खासदार इम्तियाज जलील ( imtiyaz Jalil) यांच्या कामाचे कौतुक केले आहे. भाजप आमदाराने एमआयएमच्या खासदारांचे कौतुक केल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. ( The district is in turmoil due to Ex MP Chandrakant Khaire, MP imtiyaz Jalil's excellent work; BJP MLA Prashant Bamb praises MIM MP Imtiyaz Jalil)
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave )आणि भागवत कराड यांना दिल्लीत असतानाही भेटून शुभेच्छा दिल्या नाहीत. यावर प्रतिक्रिया देताना खैरे यांनी दानवे यांनी माझा पराभव केला आहे, त्यांना मी शुभेच्छा देणार नाही अशी टीका केली. तर डॉ. भागवत कराड यांना मी नगरसेवक, महापौर केले, त्यांची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. ते मला नेता मानतात. यामुळे दिल्लीत त्यांची भेट घेतली नसली तरी ते मला भेटायला येतील असा चिमटा काढला होता. भाजपचे गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना यावर प्रत्युत्तर दिले आहे. माजी खासदार खैरे यांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची वाताहत केली आहे. कराड यांची खैरे कधीच बरोबरी करू शकत नाहीत. आता कराड आणि दानवे जिल्ह्याचा विकास करतील, खैरेंनी विकास कामात अडथला आणू नये अशी टीका आमदार प्रशांत बंब यांनी केली.
कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही
एमआयएमचे खासदार जलील यांचे कौतुक खैरेंवर टीका करते वेळी आमदार बंब यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं कौतुक केलं आहे. त्यांचे आणि आमचे मतभेद असले तरी त्यांच्या कामाबाबत त्याचं कौतुक करावं लागेल. शहरात खैरे यांच्यापेक्षा जलील विकासाची काम करत आहेत, हे आपण मानलं पाहिजे. जरी एमआयएम आणि भाजप विरोधक असू, पण जी चांगली काम आहेत त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, असेही बंब म्हणाले.
तेजस ठाकरे युवासेनेच्या प्रमुखपदी ? वरुण सरदेसाई यांनी केले मोठे विधान