शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

फोडणीसोबतच देवासमोरील दिवाही महागला; खाद्यतेलात लीटरमागे १० रुपये भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 2:34 PM

ऐन श्रावणाच्या तोंडावर खाद्यतेलात वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देसणासुदीच्या दिवासात महागाई आणखी किती बेलगाम होईल हे सांगणे कठीण आहे.दुकानात फलकावरील तेलाचे भाव पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : सोयाबीन व पामतेलात (खाद्यतेल) १० रुपये वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला. भाजीची फोडणीच नव्हे तर देवासमोर दिवा लावताना आता गृहिणी हात आखडता घेत आहेत.सध्या पामतेल १३० रुपये तर सोयाबीन तेल १५० रुपये प्रतिलीटर विकत आहे. सोयाबीन तेलाचे भाव पहिल्यांदा शेंगदाणा तेलाच्या बरोबरीला आले आहेत.

ऐन श्रावणाच्या तोंडावर खाद्यतेलात वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढली आहे. पुढे ऐन सणासुदीच्या दिवासात महागाई आणखी किती बेलगाम होईल हे सांगणे कठीण आहे. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. दुकानात फलकावरील तेलाचे भाव पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. देशात सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. काही दिवसांपूर्वी लातूर येथे सोयाबीनला ९ हजार रुपयांचा तर मध्य प्रदेशातील मंदसौर येथील पिपलियामंडीत प्रतिक्विटलला १२ हजार रुपयांचा भाव मिळाला. याचा परिणाम, सोयाबीन तेलाचे भाव वाढण्यावर झाला. पामतेल उत्पादक देश मलेशियामध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे तेथून पामतेलाची आयात होण्यास उशीर लागत असल्याने त्याचा परिणाम पामतेलाच्या भाववाढीवर झाल्याचे होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले.

आणखी भाववाढीचे संकेतमहाराष्ट्रात सोयाबीनचे भाव ९ हजार रुपये क्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. सोयाबीन महागल्याने खाद्यतेलात भाववाढ होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या दिवसात सोयाबीनमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते. पामतेलही महागते आहे. यामुळे मागील सहा महिन्यात ३० टक्के ग्राहकांनी खाद्यतेल खरेदी कमी केली आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसत आहे.- जगन्नाथ बसय्ये, विक्रेते

सणासुदीत महागाई वाढतेचसरकार कोणतेही असो, सणासुदीच्या तोंडावर महागाई वाढतेच. आताही त्याची प्रचिती येत आहे. खाद्यतेलात तर मागील वर्षभरापासून भाववाढ होत आहे. तसेही मागील ३ वर्षांपासून डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आम्ही खाद्यतेल वापरणे निम्म्याने कमी केले आहे.- नीता खडके, गृहिणी, शिवाजीनगर

खाद्यतेल             १ जुलै (प्रतिलीटर)             ३० जुलैपामतेल             १२० रु.                         १३० रु.सोयाबीन तेल १४० रु.                         १५० रु.सरकी तेल             १४५ रु.                         १४५ रु.सूर्यफूल तेल १६० रु.                         १६० रु.शेंगदाणा तेल १६० रु.                         १६० रु.करडी तेल            २०५ रु.                         २०५ रु.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पagricultureशेती