त्यांनी सांगितले की, ओबीसी भटके विमुक्तांना राजकीय आरक्षण ताबडतोब लागू करण्यात यावा, अन्यथा ओबीसींच्या प्रस्थापित नेते व मंत्र्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजेत. ओबीसी व भटके विमुक्त अडगळीत पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लवकरच बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीतर्फे लढे उभारले जाणार आहेत.
त्यांनी आरोप केला की, मंडल पाहिजे की कमंडलू म्हणणारे आज ओबीसींचा पुळका काढून रस्त्यावर आंदोलन करण्याचे नाटक करीत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक ओबीसी नेते मंत्री आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले व राज्य सरकार स्वतःचा हलगर्जीपणा झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे.
योगेश बन, प्रभाकर बकले, महेश निनाळे, सतीश गायकवाड, संदीप जाधव, सतीश शिंदे, श्रीरंग ससाणे, पंकज बनसोडे, पंडितराव तुपे, शैलेंद्र मिसाळ, गणेश खोतकर, मोहन बोरुडे आदींची यावेळी उपस्थिती होती.