लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : रिसनगाव ता़लोहा येथील दिव्यांगाने व्यवसायासाठी जागेची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला़ मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने न्याय द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़संतोष देवराव पवार असे दिव्यांगाचे नाव आहे़ वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुलींच्या पालणपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे़ ६३ टक्के दिव्यांग संतोष यांनी बसस्थानकासमोरील एका दुकानाच्या पायरीखालील जागेत भाड्याने पानटपरी सुरू केली़ या माध्यमातून कुटुंबाचा भार, जागेचे भाडे भरणे कठीण झाले़ त्यामुळे ३ टक्के निधी मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा केला़ मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही़
दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या
By admin | Published: June 24, 2017 12:12 AM