३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. शहरात धोंडिरामसिंह राजपूत यांनी सारंगी-नारंगी नदीच्या काठावर लोहारकीचे काम करणारे व दोन्ही पायांनी जन्मापासून अपंग असलेले शंकर दगडू सोनवणे यांचा घरी जाऊन पती-पत्नीचा शाल, श्रीफळ व टोपी देऊन सत्कार केला. यावेळी सोनवणे यांनी लोहारकीचा व्यवसाय सध्या चालत नसल्याने तंगीत दिवस काढावे लागत असल्याची खंत व्यक्त केली.
फोटो कॅप्शन : दिव्यांग शंकर सोनवणे यांचा सन्मान करताना धोंडिरामसिंह राजपूत.