औरंगाबाद : आश्वासन नको आता कृती करा, असे म्हणत शहरातील बीड बायपास रोडवर वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या सातारा देवळाईकरांनी आज महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, यांना धारेवर धरले. अपघात मुक्तीसाठी सर्व्हिस रोडचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी, मागणी नागरिकांनी केले.
संग्रामनगर उड्डाणपूल येथे झालेल्या बैठकीत सातारा देवळा येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही यावेळी उपस्थिती होती. नागरिकांनी बीड बायपास वर होणाऱ्या अपघातांना कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आतापर्यंत ५० वर लोकांचा बळी या रस्त्याने घेतलेला आहे. तरीही महापालिका बीड बायपास रुंदीकरण सर्व्हिस रोडचा प्रश्न का सोडवत नाही, असा जाब नागरिकांनी महापौरांना विचारला. चौकामध्ये वाहतूक पोलीस नसतात, ट्रक चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात, नागरिकांचा निष्पाप जीव जात आहे. तरीही प्रशासन काहीही करत नसल याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला. महापौरांनी यावर लवकरच मार्ग काढला जाईल ,असे आश्वासन दिले पोलीस आयुक्तांनी ही बीड बायपासवर अवजड वाहनांच्या प्रवेशाचा वेळ वाढवला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले.
पहा व्हिडिओ :