शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

युती नकोच; भाजपच्या इच्छुकांची जोरदार मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:49 PM

बहुतांश इच्छुकांनी स्वबळावर लढण्याची मागणी नोंदविली. 

ठळक मुद्देराज्यमंत्री सावेंची मुलाखत मोबाईलवर मध्य आणि पश्चिमवर दावेदारी

औरंगाबाद/वाळूज महानगर : भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतील ५८ इच्छुकांच्या मुलाखतींमधून तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेतला. बजाजनगरातील एका महाविद्यालयात निरीक्षक आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी इच्छुकांची मते मुलाखतीतून जाणून घेतली. बहुतांश इच्छुकांनी स्वबळावर लढण्याची मागणी नोंदविली. 

राज्यमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात पुन्हा एकदा संजय केणेकर यांनी उमेदवारी मागितली आहे, तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना यावेळी इच्छुक वाढल्यामुळे उमेदवारी मिळणे अवघड जाणार असल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, शिवसेना- भाजप युतीत निवडणूक लढविण्याचे बोलले जात असले तरी भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. भाजपने सर्व मतदारसंघांतील पाहणी करून एक अहवाल तयार केला आहे. त्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या इच्छुकांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. त्या यादीत नावे समाविष्ट असलेल्या इच्छुक उमेदवारांना बुधवारी दुपारपासून बजाजनगरातील हायटेक महाविद्यालयात मुलाखती घेण्यात येणार असल्याचा निरोप देण्यात आला होता. या निरोपानंतर गुरुवारी बजाजनगरात जिल्हाभरातील इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. भाजपचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी, एकनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला भाजपच्या शहर व ग्रामीण कोअर कमिटीची बैठक घेऊन झाली. खा. धोत्रे यांनी जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

राज्यमंत्री सावेंची मुलाखत मोबाईलवर या मुलाखतीत उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी मोबाईलवर मुलाखत दिली. इतर इच्छुकांनी स्वत: मुलाखती दिल्या. सावे हे कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी मोबाईलवरूनच मुलाखत देऊन टाकली. मुलाखतीत इच्छुकांना भाजपत किती दिवसापासून काम करता, पक्षात येण्यापूर्वी कोणत्या पक्षात होते. आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या. कुटुंबातील कोणी सदस्य राजकारणात आहे काय, विधानसभा क्षेत्राचे नाव व नंबर काय आहे, तुमच्या मतदारसंघाच्या आजूबाजूला असणाऱ्या चार विधानसभा क्षेत्रांची नावे काय आहेत, असे प्रश्न विचारण्यात आल्याचे मुलाखत दिलेल्या काही उमेदवारांकडून समजले. इच्छुकांनी आजवर केलेला बायोडाटा, वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांच्या कात्रणांच्या संचिका धोत्रे यांच्याकडे दिल्या.

मध्य आणि पश्चिमवर दावेदारीया मुलाखतीच्या वेळी बहुसंख्य इच्छुकांनी युती न करण्याची भूमिका मांडली. युती झाली तरी औरंगाबाद मध्य हा शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, अशी इच्छुक उमेदवारांनी जोरदार मागणी केली. मध्य मतदारसंघात मागील दोन विधानसभा निवडणुकांत शिवसेनेचा पराभव झाला आहे. याच भागातील चंद्रकांत खैरे यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. या मतदारसंघात एमआयएमचा पराभव भाजपच करू शकते. या कारणामुळे हा मतदारसंघ भाजपकडे असावा, अशी भूमिका इच्छुकांनी निरीक्षकांकडे मांडल्याची माहिती मिळाली. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघावरही भाजपच्या इच्छुकांनी दावा केल्याची माहिती मिळाली. या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचा आहे. या मतदारसंघात २०१४ साली भाजप दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे यंदा भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असा दावा मुलाखती दिलेल्या सर्वच इच्छुकांनी केल्याची माहिती मिळाली. युती झाल्यास या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे समजते. फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी पक्की असल्याचे सांगितले जात असतानाच इच्छुक असलेल्या इतरांनाही उमेदवारी मिळण्याची आशा आहे. 

मतदारसंघनिहाय इच्छुकऔरंगाबाद पूर्व मतदारसंघ : राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडा सभापती संजय केणेकर.औरंगाबाद मध्य : किशनचंद तनवाणी, संजय केणेकर, अनिल मकरिये, राजगौरव वानखेडे.औरंगाबाद पश्चिम : राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, पंकज भारसाखळे, गजानन नांदूरकर, जालिंदर शेंडगे, चंद्रकांत हिवराळे, उत्तम अंभोरे.  फुलंब्री : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, प्रदीप पाटील, उपमहापौर विजय औताडे. वैजापूर : जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परदेशी, नबी पटेल, कल्याण गोर्डे, ज्ञानेश्वर जगताप, मोहन आहेर, कचरू डिके, नारायण तुपे, प्रशांत इंगळे.गंगापूर : आ. प्रशांत बंब, किशोर धनायत, दिलीप पा. बनकर.सिल्लोड : सुरेशराव बनकर, सांडू लोखंडे, ज्ञानेश्वर मोटे, इद्रीस मुलतानी, अशोक गरुड, सुनील मिरकर, पुष्पाबाई काळे, किरणताई जैस्वाल, श्रीरंग साळवे, मकरंद कोरडे, डॉ. पाखरे.पैठण : डॉ. कांचनकुमार चाटे, तुषार पा. शिसोदे, अ‍ॅड. कांतराव औटे, कल्याण गायकवाड, लक्ष्मण औटे, रेखा कुलकर्णी, डॉ. सुनील शिंदे, राजेंद्र भांड, योगेश सोसाटे, गोपीनाथ वाघ.कन्नड : संजय खंबायते, किशोर पवार, सुरेश गजुराने, बन्सीभाऊ निकम, प्रकाश देवरे, कल्याण जंजाळ.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभा