शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

गाडीने होऊ नये, जिवाची बिघाडी

By admin | Published: June 10, 2014 12:03 AM

लातूर-$गेल्या आठवड्यात भाजपाचे नेते व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले़

लातूर-$गेल्या आठवड्यात भाजपाचे नेते व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले़ मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली होती़ त्या पार्श्वभूमीवर सीट बेल्टसह इतर सुरक्षा व्यवस्थेचा किती काळजीपूर्वक वापर होतो, नेत्यांच्या ड्रायव्हरना त्यासंबंधीचे कितपत भान असते, येथपासून ते नेतेही त्याबाबत किती बेफिकीर असतात यावर प्रकाशझोत़़़ त्यांच्या जीविताची सर्वांनाच काळजी वाटते म्हणूऩ़़़!नेत्यांना काही सूचना़़़़नेत्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळा पाळल्यास विलंब टाळता येऊ शकतो़कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमांची संख्या वाढवायची आणि मग पळापळ होते़आपला चालक वेळेत जेवला आहे का, त्याला काही प्रकृतीचा त्रास आहे का, त्याला विश्रांतीची गरज आहे का, हे पाहण्याची जबाबदारी नेत्यांचीच असते़कायम एकच ड्रायव्हर घेण्यापेक्षा त्यांच्या आळीपाळीने ड्यूटी लावल्यास जास्त योग्य़आपण नेते आहोत म्हणून नियम मोडण्यात आपणच पुढाकार घेतो़ ते टाळल्यास दुर्घटना टाळली जाऊ शकते़रोज आपण किती प्रवास करायचा याचेही बंधन घालून घ्यायला हवे़ही काळजी घ्या़़़वेगाचे भान राखा़ कायद्याने हलक्या मोटारगाडीवर वेगाचे बंधन नसले तरी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी वेग मर्यादित ठेवा़गाडीत मागे व पुढे बसणाऱ्या सर्वांनी सीट बेल्ट बांधावेत़चालकांनी दररोज गाडीच्या इंजिनची पाहणी करावी़ जरा जरी संशय आल्यास दुर्लक्ष न करता मेकॅनिकला तत्काळ दाखवावे़वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका़गाडीतील हवा व ब्रेक सिस्टिमची नियमित तपासणी करावी़महत्त्वाच्या लोकांच्या ताफ्यातील गाड्यांकडे विशेषत: लहान मुले कुतुहलाने पाहतात़ कोणी आडवे येत नाही ना, याची दक्षता घ्या़कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी चालकास वेगात वाहन चालविण्याची सक्ती करणे टाळा़मेंटेनन्सअभावी वाहनचालकांची कसरत...लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयातंर्गत महसूल विभागाच्या ताफ्यात १८ वाहने आहेत़ परंतु, या १८ वाहनांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी प्रत्येक वर्षाला प्रत्येक वाहनाला २० हजार रुपये शासन दरबारी दिले जातात़ मात्र, इतक्या कमी निधीमुळे कधी या वाहनांचे टायर फुटणे, कधी ब्रेक निकामी होणे, तर कधी बंद पडणे अशा संकटांना या वाहनचालकांना तोंड द्यावे लागते़विशेष म्हणजे, वाहन रस्त्यात बंद पडले की, गाडीतील साहेब आहे त्या परिस्थितीत दुसरे खासगी वाहन बोलावून निघून जातात़ मग तेथून पुढे चालकाची कसरत सुरु होते़ अशा एक ना अनेक परिस्थितीत शासकीय वाहनचालकांना दररोज संकटांनाच सामोरे जावे लागते़ शासकीय कामांसाठी ही वाहने फिरवली जातात़ दगड, मुरुड, माती, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, अशा ठिकाणी भेट देण्यासाठी अधिकारीवर्गही शासकीय वाहनेच वापरतात़ यामध्ये वाहनांची देखभाल करण्याचेही काम प्रसंगी खिशातून पैसे घालून वाहनचालकांना करावे लागते़ मंत्र्यांच्या ताफ्यात शासकीय अधिकाऱ्यांनाही सहभागी व्हावे लागते़ अशावेळी योग्य मेंटेनन्स नसलेली वाहनेही वापरावी लागतात आणि त्यांच्या अत्याधुनिक पध्दतीच्या वाहनांबरोबर ही वाहने पळवावी लागतात़ त्यामुळे वाहन चालवताना वाहनांतील जिवांबरोबर स्वत:चाही जीव अक्षरश: टांगणीला लागतो़आमचे दिवसाचे नियोजन व्यस्त असते़ त्यामुळे वाहन असले तरी धावपळ होतेच़ तरी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे़ अहमदपुरातून बाहेर प्रवास करताना मी सीट बेल्ट आवर्जून बांधतो़ - बाबासाहेब पाटील, आमदाऱनेतेमंडळींसह अधिकाऱ्यांनी वाहन चालकाकडे एक माणूस म्हणून पाहावे़ चालक लोक असंघटित असल्याने त्यांच्यावर कोणत्याही कामाचे बंधन नसते़ त्यांना कधीही बोलावणे येईल तेव्हा गाडीवर जावे लागते़ ड्रायव्हरची वाहन चालविण्याची मानसिकता आहे का? त्याची झोप व्यवस्थित झाली आहे का? त्याने जेवण वेळेत घेतले आहे का? हे पाहणे गरजेचे आहे़ - डी़ बी़ माने, रस्ता सुरक्षा समितीलातूरच्या प्रकाशनगरातील शंकर साळुंके हे गेल्या चार वर्षापासून खासदार डॉ़ सुनील गायकवाड यांचे वाहनचालक आहेत़ गायकवाड यांच्याकडून विश्रांतीबाबतही काळजी घेतली जाते़ परंतु, आता कामाचा व्याप वाढला आहे़ त्यांनी सुरक्षित प्रवासासाठी माझ्यासह अन्य तीन ड्रायव्हर ठेवले आहेत़ - शंकर साळुंके, चालक़वेळेत पोहोचण्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे़ याचे भान सर्वांनी ठेवणे महत्त्वाचे आहे़ वानचालकांना सीटबेल्ट, बे्रकिंग डिस्टन्स, आरशाचे महत्त्व, वेगमर्यादा, गर्दीचे महत्त्व लक्षात यावे़ वाहतूक चिन्हांची ओळख व्हावी़ - आऱ टी़ गिते, परिवहन अधिकारी, लातूर.बचावात्मक वाहन चालविणे म्हणजेच डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. प्रथमत: दुसऱ्यांची सोय पाहणे आणि आपली सुरक्षा करणे हा हेतू या संकल्पनेमागे आहे़ या पध्दतीचा व्हीआयपीसह प्रत्येक वाहनचालकाने अवलंब करणे गरजेचे आहे़- डी़ व्ही़ निलेकर, मोटार वाहन निरीक्षक, लातूर.