छत्रपती संभाजीनगर : ‘व्हिटॅमिन बी १२’ ची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, जर वारंवार थकवा येत असेल, अशक्तपणा वाटत असेल, चालताना तोल जात असेल तर वेळीच सावध झाले पाहिजे. ‘व्हिटॅमिन बी १२’ तपासणी केली पाहिजे. त्याची कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी औषधोपचारासह आहाराकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
‘व्हिटामिन बी १२’ आवश्यक का?लाल रक्तपेशींची निर्मिती करणे, मज्जासंस्था निरोगी बनविणे, यासाठी ‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वपूर्ण ठरते. अशक्तपणा, थकवा, आळस, पायाला मुंग्या येणे असा त्रास होत असेल तर तो या जीवनसत्त्वाअभावी असण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
‘व्हिटामिन बी १२’ तपासणी कधी करावी?अशक्तपणा, तोल जाणे, कंबरदुखी, तळपायाला मुंग्या येणे, धडधड वाढणे, चक्कर येणे असा त्रास होत असेल तर ‘व्हिटॅमिन बी १२’ ची तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.
काय काळजी घ्याल?‘व्हिटॅमिन बी १२’ मिळण्यासाठी आहार महत्त्वाचा ठरतो. ‘बी १२’ हे प्रामुख्याने मांसहारातून, तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते. त्याबरोबरच सोयाबीन, ब्रोकलीतूनही ते मिळते. त्यामुळे या पदार्थांचा समावेश आहारात करावा.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वाचे आहे. हे प्रामुख्याने मांसाहारातून मिळते. शाकाहारी व्यक्तींना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतून ते मिळते. ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेमुळे मुंग्या येणे, अशक्तपणा असा त्रास होताे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दर ६ महिन्याला तपासणी करून घ्यावी.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्सतज्ज्ञ