शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

एटीएम पळविणाऱ्या टोळीचा तीन दिवसांनंतरही माग लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 7:27 PM

पोलिसांनी देशभरातील चोऱ्यांची माहिती मागविली

ठळक मुद्दे२४ तासांत घडल्या होत्या दोन घटना कोल्हापूर पोलिसांनी पकडले होते आरोपींना

औरंगाबाद : बायपासवरील एटीएमसह २५ लाखांची रोकड पळविण्यासोबतच पडेगावच्या मिसबाह कॉलनीतील एटीएम गॅस कटरने कापून रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अशा प्रकारच्या १५हून अधिक घटना राज्यातील विविध शहरांत अलीकडच्या काळात घडल्याने विविध ठिकाणच्या पोलिसांशी संपर्क साधला जात आहे.

बीड बायपास रस्त्यावरील यशवंतनगरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम २५ लाख १४ हजार ७०० रुपयांसह चोरट्यांनी १२ जुलैच्या रात्री चक्क उचलून नेले. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत दुसऱ्या दिवशी १३ जुलै रोजी रात्री चोरट्यांनी पडेगावच्या मिसबाह कॉलनीतील एटीएम मशीन गॅस कटरने कापून रोख पळविण्याचा प्रयत्न केला. २४ तासांत दोन घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आणि एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एटीएम पळविण्याची घटना कळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पाचोड, शहागडपर्यंत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. ढाबे, हॉटेलचालकांकडे विचारपूस केली. मात्र, त्यांना चोरट्यांचा मागमूस लागला नाही. पुंडलिकनगर पोलिसांनीही एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या ईपीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पडेगावमधील एटीएम तोडून सुमारे चार लाखांचे नुकसान क रणे आणि एटीएममधील रोकड पळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नीलेश प्रल्हादराव शेजवळ यांनी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

कोल्हापूर पोलिसांनी पकडले होते आरोपींना

एटीएम पळविण्याची घटना काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे घडली होती. यानंतर पोलिसांनी एटीएम पळविणाऱ्या टोळीला अटक केली होती. कोल्हापूर शहरातील रहिवासी असलेल्या आरोपींनीच एका वाहनामध्ये हायड्रोलिक यंत्र बसवून त्याद्वारे एटीएम मशीन उचलून नेले होते. त्या घटनेतील आरोपींचा औरंगाबादेतील घटनेशी संबंध आहे का, याबाबतची पडताळणी पोलीस करीत आहेत.

सीसीटीएनएसकडून मागविला अहवालएटीएम पळविण्याच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेने सीसीटीएनएसची मदत घेण्याचे ठरविले आहे. राज्यात आणि देशात यापूर्वी एटीएम पळविण्याच्या घटना कोठे आणि कधी घडल्या आहेत, तसेच हे गुन्हे करणाऱ्या आरोपींना पकडले होते का? याबाबतची माहिती औरंगाबाद पोलिसांनी सीसीटीएनएसकडून मागविली आहे. एटीएम पळविणारी गँग राज्यात सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून, पोलीस आता अलर्ट झाले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादatmएटीएमtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी