लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलिसात तक्रार केल्याचा राग आल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी असलेल्या जावयाने सासूरवाडीत घरावर दगडफेक केली. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजता शहरातील धानोरा रोड भागात घडली.डॉ. रमेश ओव्हाळ, लक्ष्मण ओव्हाळ, दैवशाला ओव्हाळ, गिरीश साबळे व अन्य एक (सर्व रा. बारामती) यांचा आरोपींत समावेश आहे. २००५ मध्ये बीडच्या धानोरा रोड भागातील अॅड. शैलेंद्र कांबळे यांच्या बहिणीचा विवाह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश ओव्हाळशी झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी कांबळे यांच्या बहिणीला माहेराहून पैसे आणत नाही म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. ९ मे रोजी अॅड. कांबळे यांनी बहीण व तिच्या दोन मुलांना बीड येथे आणले होते. रविवारी सकाळी डॉ. रमेश ओव्हाळ अन्य काही जणांना घेऊन बीडला आला. त्याने कांबळे यांच्या घरावर दगडफेक केली. यामध्ये घराच्या खिडक्या फुटल्या. शिवाय केशवराव कांबळे हे जखमी झाले. या प्रकरणी अॅड. कांबळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास फौजदार बी.डी. सोनार करीत आहेत.
डॉक्टर जावयाकडून सासूरवाडीत दगडफेक
By admin | Published: May 14, 2017 10:42 PM