लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या येऊ घातलेल्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ या बिलातील जाचक कलमांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय.एम.ए.)२ जानेवारीला संप पुकारला आहे. यामध्ये शहरातील १५०० पेक्षा अधिक डॉक्टर सहभागी होणार असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील, अशी माहिती ‘आयएमए’तर्फे देण्यात आली.२ जानेवारीला हे बिल संसदेत चर्चेसाठी सादर होणार आहे. या बिलाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध असून, हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातील काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे. हे बिल गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित ठेवणार असून, देशातील वैद्यकीय सेवेचा दर्जा खालावणार आहे. या बिलामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराला हातभार लागेल. गैरपद्धतीने निरनिराळ्या पॅथींची संलग्नता वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात खा. चंद्रकांत खैरे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. सामान्य होतकरू विद्यार्थ्यांना, गरीब जनतेला वेठीस धरणाºया या बिलाच्या विरोधात मंगळवारी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे,अशी माहिती ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर यांनी दिली.बंददरम्यान बाह्यरुग्ण सेवा बंद राहणार आहे; परंतु सर्व अत्यावश्यक सेवा सुरूराहतील. ‘आयएमए’चे जवळपास १५०० डॉक्टर यामध्ये सहभागी होणार आहे, असेही डॉ. रमेश रोहिवाल यांनी सांगितले.
डॉक्टरांचा आज संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:56 AM