शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

डाॅक्टरांना देव म्हणतात, मग त्यांच्यावर विश्वास ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 3:41 PM

डाॅक्टर्स डे : डाॅक्टर म्हणाले, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, आमच्याकडे कोणी येऊच नये

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : डाॅक्टरांकडे आजही देव म्हणून पाहिले जाते. त्यांच्याकडे गेले की रुग्ण बरा होणार, असा विश्वास असतो. मात्र, काही कमी जास्त झाले तर डाॅक्टरांना दोषी धरले जाते. रुग्णांसाठीच २४ तास ते कार्यरत असतात. त्यामुळे डाॅक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यातही प्रत्येकाने स्वत:ची आणि इतरांची काळजी घेतली तर आजारी पडण्याची वेळच येणार नाही आणि डाॅक्टरांकडे जाण्याची वेळच पडणार नाही, अशी भावना ‘डाॅक्टर डे’ निमित्त शहरातील डाॅक्टरांनी व्यक्त केली.

दरवर्षी १ जुलैला ‘डाॅक्टर्स डे’ साजरा केला जातो. घाटी, जिल्हा रुग्णालय, मनपाची आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालय, अशा प्रत्येक ठिकाणचे डाॅक्टर हे रुग्णांसाठीच कार्यरत आहेत. परंतु, काही जणांमुळे सर्वांना त्रास सहन करावा लागतो. काही आजारांवर उपचार नसतात. तरीही डाॅक्टर पूर्ण प्रयत्न करीत असतात. वर्षातून एकदा डाॅक्टरांच्या कामाचे कौतुक होता कामा नये. डाॅक्टरांवरील विश्वास कायम राहावा, त्यासाठी डाॅक्टर प्रयत्नशील असतात, असे शहरातील डाॅक्टरांनी सांगितले.

रात्री-बेरात्री सेवाडाॅक्टरांना रुग्णांसाठी रात्री-बेरात्री कधीही जावे लागते. रुग्ण, नातेवाइकांनी डाॅक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे. नव्या डाॅक्टरांनी पूर्ण क्षमतेने आणि भविष्यातील परिस्थितीचा विचार करून रुग्णसेवा द्यावी.- डाॅ. सचिन फडणीस, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

६५० वर महिला डाॅक्टरऔरंगाबादेत ६५० पेक्षा अधिक महिला डाॅक्टर कार्यरत आहेत. डाॅक्टर म्हणून रुग्णसेवा देणे, हे सर्वाधिक आनंददायी वाटते. नागरिकांनी स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.- डाॅ. उज्ज्वला दहिफळे, सचिव, आयएमए

वास्तव स्वीकारावेडाॅक्टर म्हणून प्रत्येक रुग्ण का पूर्णपणे बरे करू शकत नाही, असा प्रश्न अनेकदा पडतो. रुग्ण आणि नातेवाईक यांच्या डोळ्यातील मृत्यू आणि कॅन्सरबद्दलची भीती रोजच अनुभवते. परंतु, मृत्यू नैसर्गिक आहे. ते वास्तव स्वीकारायला हवे.- डाॅ. अर्चना राठोड, शासकीय कर्करोग रुग्णालय

डाॅक्टरांना समजून घ्याघाटीत ५५० निवासी डाॅक्टर रुग्णसेवा देतात. कामाचा अधिक भार आहे. औषधी उपलब्ध नसल्यावरच चिठ्ठी लिहून देतो. पण, त्याला डाॅक्टर जबाबदार नाही. रुग्ण, नातेवाइकांनी डाॅक्टरांना समजून घेतले पाहिजे.- डाॅ. अक्षय क्षीरसागर, अध्यक्ष, मार्ड

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर