लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई उपजिल्हा रुग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी शुक्रवारी सकाळी अचानक भेट दिली होती. येथे गैरहजर असणाºयांचा पगार कपातीची कारवाई केली. त्यानंतर याचे पडसाद शनिवारी जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाले. उशिरा येणारे डॉक्टर, कर्मचारी हे सकाळी ९ वाजताच आपल्या आपल्या कक्षात खुर्चीवर पहावयास मिळाले. हा दरारा कायम राहिला तर रुग्णांचे हाल होणार नाहीत, हे निश्चीत.येथील जिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर ‘रुग्णसेवा हीच इश्वरसेवा’ या वाक्याप्रमाणे रुग्णांवर उपचार करतात. तर काही कामचुकार डॉक्टर, कर्मचारी कार्यालयीन वेळेत येण्यास उदासिन आहेत. तसेच काहीजण केवळ बायोमेट्रीक करून इतरत्र वावरत असल्याचे वारंवार समोर आले होते. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी तात्काळ बैठक घेऊन सक्त सुचना दिल्या होत्या. तरीही दिवाळीपूर्वी स्त्री रोग विभागातील डॉक्टर गैरहजर असल्याचे समोर आले होते. यावरही थोरात यांनी संबंधितांना धारेवर धरले होते.दरम्यान, शुक्रवारी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात अचानक भेट देऊन डॉ.थोरात यांनी स्टींग करून येथील रामभरोसे चालणा-या कामांची पाहणी केली. गैरहजर असणाºयांचा पगार कपातीचे आदेशही दिले होते. गेवराईत कारवाई झाल्याचे समजताच शनिवारी सकाळी ९ वाजताच जिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख, डॉक्टर, कर्मचारी, परिचारीका कर्तव्यावर हजर झाल्याचे दिसले. यामुळे रुग्णांचे हाल झाले नाहीत. डॉक्टरांनी नियमित वेळेवर येऊन रुग्णसेवा देण्याची मागणी होतआहे.
स्टींग गेवराईत; इफेक्ट बीडमध्ये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:20 AM