करमाड : आॅल इंडिया पयाम-ए-इंसानियत फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित ‘आपला समाज आपली जबाबदारी’ या विषयावर श्बाभुलगावकर (महंत) शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप खडके, मौलाना जुनेद फारुकी, एकनाथ साळुंके, भाऊराव मुळे, रामुराव शेळके, दत्तात्रय उकिर्डे, सय्यद जमीर,अशोक कुलकर्णी, जहीर करमाडकर, कैलास उकर्डे, विठ्ठलराव कोरडे, डॉ. जिजा कोरडे, रफिक पठाण, रमेश आघाडे, आबासाहेब भोसले आदी उपस्थित होते.
बाभुलगावकर शास्त्री महाराज म्हणाले की, सर्वधर्मांची शिकवण ही सारखीच असून, मानवतेचाच संदेश देणारी आहे. प्रा. प्रदीप खडके व मौलाना जुनेद फारुकी यांनी सांगितले की, आपल्या निरोगी समाज रचनेसाठी माणूस म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी महत्वाची आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाना आसिफ सिद्दीकी,मिर्झा हारून बेग, सिराज पठाण, मौलाना अमीन नदवी,मौलाना मुफ्ती समीर,मौलाना हाफीस अस्लम, मौलाना हाफिज मोहसीन, मिर्झा रईस बेग,सय्यद कदीर,मिर्झा फिरोज बेग,शेख आसेफ, हाजी सलीम पठाण, किशोर मिसाळ, निसार पठाण, अन्सार पठाण,शेख नाजीम, इम्तियाज कुरेशी आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शेख रउफ यांनी केले तर आभार मिर्झा हारून बेग यांनी मानले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.