फुलंब्री : घरात होणाऱ्या सततच्या अंतर्गत वादातून संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीचे वार करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गिरसावळी गावात बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून वडील ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर (५२) याच्याविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गिरसावळी येथील ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर व पत्नी विमलबाई गाडेकर (५२) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद होत असे. त्यामुळे तो औरंगाबाद शहरात एकटाच राहत होता. लॉकडाऊन लागल्यामुळे चार महिन्यांपासून ज्ञानेश्वर गाडेकर हा चार महिन्यांपासून गावाकडे येऊन शेतात छप्पर टाकून एकटाच राहत होता. स्वयंपाक देखील स्वत:च करीत होता. बुधवारी ज्ञानेश्वर गाडेकर हा शेतातून सायंकाळच्या वेळेला कुऱ्हाड घेऊन गावात आला. घरी गेल्यावर पत्नीशी वाद घालून त्याने तिच्या छाती, पोटात व पाठीवर कुऱ्हाडीने वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
काही वेळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शेतशिवारात असलेल्या त्याच्या मुलाला देखील माहिती मिळाली. मुलाने घराकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला घेऊन त्याने ग्रामीण रुग्णालयात गाठले. डॉक्टरांनी विमलबाई गाडेकर यांना मृत घोषित केले. मुलगा शिवनाथ गाडेकर (२३) याने रात्री उशिरा फुलंब्री पोलीस ठाणे गाठून वडील ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे करीत आहेत.
----
वादाचा शेवट झाला खुनानेच
ज्ञानेश्वर गाडेकर याला दोन मुली व दोन मुले आहेत. यातील दोन मुली व एका मुलाचे लग्न झालेले असून एक मुलगा अद्याप अविवाहित आहे ज्ञानेश्वर गाडेकर यास स्वत;च्या मालकीची चार एकर शेतजमीन आहे. त्याचे पत्नी विमलबाई गाडेकर यांच्याशी कायम वाद होते. या वादाचा शेवट अखेर त्याने खून करूनच केला.
--
फोटो :
मृत विमलबाई गाडेकर यांचा फोटो.
सूचना -- दोन फोटो