वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात असलेल्या संकट मोचन हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेºयात दोन चोरटे कैद झाले आहे. नेमकी किती रोकड चोरीला गेली हे कळू शकले नाही.कामगार चौकातील हनुमान मंदिरात सोमवारी सकाळी भाविक दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिराचे प्रवेशद्वार तुटलेले तसेच दानपेटी फुटलेली दिसून आली. भाविकांनी या भागातील ट्रॉन्सपोर्टचालकांना माहिती दिली. त्यांनी मंदिराची पाहणी केली असता प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तुटलेला व दानपेटीतील रक्कम गायब असल्याचे त्यांना दिसून आले.
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मंदिरात भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात सोमवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास दोन चोरटे मंदिरात शिरल्याचे दिसत आहे. सुरुवातील पांढरा रुमाल बांधलेला एक चोरटा मंदिरात गेला. यानंतर मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडुन तो बाहेर गेला. यानंतर काही वेळातच त्याचा साथीदार मंदिरात आला त्याने तोंडाला बांधलेला रुमाल काढुन दानपेटीतील रक्कम या रुमालात बांधली तर त्याचा साथीदार बाहेर टेहाळणी करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे. अवघ्या पाच मिनिटांत दोन चोरटे मंदिरातील दानपेटी फोडून पसार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात दिसत आहे.