लोकमत न्यूज नेटवर्कडिग्रस कºहाळे : हिंगोली तालुक्यात डिग्रस कºहाळे येथील गणपती मंदिरातील तर हिवरा येथील मारोती मंदिरातील दानपेट्या अज्ञात आरोपींनी फोडून रक्कम लंपास केली. ९ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. तर एक संशयित दुचाकीही आढळली आहे.डिग्रस कºहाळे फाट्यावर असलेल्या सिद्धीविनायक गणपती मंदिरात मूर्तीसमोर ठेवलेल्या दानपेटीतून अंदाजे ४ ते ५ हजारांची रक्कम पळविली. हा प्रकार येथे पुजारी असलले ज्ञानबा संभाजी कºहाळे यांनी पोलीस पाटलांना सांगितला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तसेच औंढा नागनाथ रोडवरील हिवरा येथील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून २५ हजार रुपये लंपास केले. तर घटनास्थळी संशयित एम.एच. २२ ई. ४०८१ या क्रमांकाची दुचाकी आढळली आहे. तर चोरट्यांनी साप चावल्याचे गणपती मंदिरातील महाराजास सांगितले होते. मात्र रात्र उशिरापर्यंत गाड्या मंदिर परिसरात घुटमळत असल्याचे पुजाºयांनी सांगितले. दानपेटी फोडल्यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचा सुर निघत आहे. लवकर चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
मंदिरांमधील दानपेट्या फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:14 AM