- संतोष हिरेमठऔरंगाबाद :औरंगाबादरेल्वे स्टेशनवर १६ बोगींची पीटलाइन मंजूर झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पीटलाइनच्या पायाभरणीचा समारंभही झाला. मात्र याच समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी १६ ऐवजी २४ बोगींची पीटलाइन करण्यासाठी पडताळणी करण्याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे पीटलाइनचे प्रत्यक्ष काम सुरू होणे बारगळणारच आहे. २४ बोगींच्या पीटलाइनसाठी पडताळणी करा; पण पीटलाइनचे भूमिपूजन झाले, हे रेल्वे प्रशासनाने विसरून जाता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
औरंगाबादेत १६ बोगींची पीटलाइन मंजूर झाली. मात्र ऐन पीटलाइनच्या पायाभरणीच्या समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २४ बोगींच्या पीटलाइनसाठी रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित करावा की ठेवावा, या संदर्भात उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना अश्विनी वैष्णव यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली. त्यामुळे आता या प्रस्तावानंतरच १६ की २४ बोगींची पीटलाइन होईल, हे स्पष्ट होईल. मात्र, कागदोपत्री प्रक्रियेत पीटलाइन अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.औरंगाबाद मॉडेल स्टेशनच्या पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. २०१५ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु सात वर्षे उलटल्यानंतरही हे काम सुरूच झालेले नाही. आता पुन्हा एकदा पुनर्विकासाची तयार करण्यात येणार आहे. इमारतीप्रमाणे पीटलाइनची अवस्था होऊ नये, असे रेल्वे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
२९ कोटी मंजूरमे महिन्यात औरंगाबादेत १६ बोगींच्या पीटलाइनसाठीही २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु त्यापुढे गती नव्हती. अखेर सोमवारी पीटलाइनच्या भूमिपूजनही झाले.
दहा दिवसांत प्रक्रिया पूर्ण व्हावीकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मालधक्का स्थलांतरित होऊ शकतो की नाही, याची प्रक्रिया दहा दिवसांत केली पाहिजे. पीटलाइन होण्यासाठी लोकप्रतिनिधी, रेल्वे अभ्यासक आणि नागरिकांनी पाठपुरावा केला पाहिजे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्टेशनच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. पण पुढे काही झाले नाही, असे पीटलाइनच्या बाबतीत होऊ नये.- मोतीलाल डोईजोडे, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार