छत्रपती संभाजीनगर :कामगार रुग्णांना ‘थेट घाटीत’ पाठवू नका? संलग्न रुग्णालयात उपचार करा, त्या दवाखान्याचे बोर्ड आणि डॉक्टरांचा मोबाइल नंबरदेखील लिहावे, आयसीयू यंत्रणा अद्याप काम पूर्ण झालेले नाही. गंभीर रुग्णांची हेळसांड होतेय, अशा अनेक प्रश्नांवरही लक्ष राज्य कामगार विमा योजना आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घालून निराकरण करावे, अशी मागणी कामगार संघटना तसेच कामगारांच्या वतीने आहे.
गंभीर आजारी रुग्ण उपचारासाठी आला तर त्यास राज्य कामगार विमा दवाखान्यात उपचार न करता त्या रुग्णास घाटी रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यापेक्षा सलग्नता केलेली सुपरस्पेशालिटी रूग्णालयात रवाना का केले जात नाही, अशा प्रसंगामुळे कामगारांतील रुग्णांवर वाईट प्रसंग येतात. मराठवाड्यात एकमेव कामगार रुग्णालय असून, त्यात इतरही सेवा सुविधा देण्यात याव्या, अशी कामगार तसेच संघटनांची मागणी आहे.
आरोग्य सेवेकडे लक्ष द्यावे...चिकलठाणा, वाळूज, चितेगाव, शेंद्रा कामगारांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कागदपत्राच्या तयारीला लागावे की रुग्णांना वेळेत उपचार मिळावे याच विवंचनेत कामगार कुटुंबीयाची जिवाची घालमेल होते. हे प्रकार थांबविण्यात यावे.- सुरेश वाकडे (कामगार नेता)
थेट घाटीत का? सुपरस्पेशालिटी का नको...कामगार विमा दवाखान्याचा आधार प्रत्येक कामगार कुटुंबीयांना असतो अन् गंभीर उपचाराप्रसंगी होणारी गैरसोय फार त्रासदायक ठरते. दूरवरून आलेल्या कामगारांना उपचारासाठी फेऱ्या मारण्यापेक्षा दवाखान्यातच आसीयू तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात.- विनोद फरकाडे (कामगार नेता)