औरंगाबाद: इतिहासात नाक खुपसू नका, प्रत्येक पक्षाने वाचाळवीरांना आवरले पाहीजे. सध्याचे वातावरण गढूळ झाले आहे. औरंगाबाद शहराला सात दिवसांनी पाणी, कुठे पंधरा दिवसांनी पाणी येते. उशाला धरण आहे दुर्देवाने पाणी मिळत नाही. पाणी पुरवठ्याची योजना ३०० कोटींवरून २८०० कोटींवर गेली. इथे इतकी मंत्रिपद देऊन आणखी लोक सूटकोट रेडी करून बसलेत. लोकांचे प्रश्न समजून घेत आरोप प्रत्यारोपापेक्षा समस्या प्रश्न सोडवले पाहिजे, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.
लोकसंवाद फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उत्कर्ष पॅनलकडून नवनिर्वाचित अधिसभा, विद्यापरिषद सदस्यांचा तसेच पॅनलचे प्रमुख आ. सतीश चव्हाण, डॉ शिवाजी मदन यांचा सत्कार विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते भानुदासराव चव्हाण सभागृहात बुधवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ दिलीप वळसे पाटील, माजी आमदार किशोर पाटील, सक्षणा सलगर, माजी महापौर नंदकुमार घोडले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, रंगनाथ काळे, डॉ नरेंद्र काळे, मनोज घोडके, डॉ. गणेश मोहिते, डॉ. राम चव्हाण, डॉ. फुलचंद सलामपुरे, दत्ताभाऊ पाथ्रीकर, सुनील मगरे, दत्ता भांगे आदींसह प्राध्यापक, मान्यवरांची उपस्थिती होती. दिलीप वळसे पाटील म्हणाले, विद्यापीठावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणाचे बदल होत असताना राज्य केंद्र विद्यापीठात हस्तक्षेप करत आहे. मनुवादी विचारांचा पराभव करण्यासाठी पुरोगामी विचाराने पुढे जाताना शैक्षणिक संस्थांवर लक्ष ठेवा. सूत्रसंचालन निलेश चव्हाण, आभार विश्वनाथ कोकर यांनी यांनी मानले.
सत्ताधाऱ्यांचेही ‘दादा’उत्कर्ष पॅनलने अधिसभेच्या ३८ जागांपैकी ३१ जागांवर, विद्यापरिषदेच्या ६ जागांपैकी ५ जागेवर दणदणीत विजय मिळवल्याकडे डाॅ. मदन यांनी लक्ष वेधतांना अजित दादा विरोधकांचेही दादा असल्याचे म्हणाले. त्यावेळी हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांनी विरोधी पक्षाचे नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे म्हणे असे म्हणताच एकच हशा पिकला. प्रास्ताविकात डाॅ. राजेश करपे यांनी पवार यांच्या स्वराज्यरक्षक बाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यावेळी टाळ्यांच्या कडकडाट झाला. त्यावेळी पवार यांनी हात जोडून आभार मानले.
निर्णय घेतले पण, अंमलबजावणीत अडचणीविरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, जय पराजय चालत असतात. यशाने हुरळून जाऊ नये. पराभवाने खचू नये. शिक्षणात स्पर्धा खूप मोठी आहे. जगातली विद्यापीठ इथे येत आहे. शिक्षणाचा दर्जा टिकवणे शिक्षण संस्थांसमोरचे आव्हान आहे. अर्थमंत्री असतांना कोरोनामुळे अडचणी आल्या. निर्णय घेतले मात्र कोरोना, राजकीय स्थित्यंतरे यात अमलबाजावनी करतांनात अडचणी आल्या. सत्तेवर असो नसो वंचित घटकाला मदतीचा प्रयत्न करू. विरोधी पक्षात असल्याने प्रश्न समजून घ्या. शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीने निवडूण देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
इतिहासात नाक खुपसू नकाइतिहास इतिहासाच्या ठिकाणी आहे. ज्यांचा अभ्यास त्यांनी त्या विषयात काम करावे. आपाआपले काम करावे. इतरांच्या कामात नाक खुपसू नये. नव्या पिढीला जात पात या आरोप प्रत्यारोपात रस नाही. आपण समस्या निवारणाचे काम करत रहावे. मतदार ठोस भूमिका घेऊन मतदार करतील. असेही विरोधीपक्षनेते पवार म्हणाले.