याचा उलट परिणाम डोळ्यांचा मेकअप जास्त करण्यावर झाला आहे. मास्कमुळे आता डोळेच अधिक स्पष्ट दिसत असल्याने काजळ, आय लायनर, आयब्रो पेन्सिल, आय शॅडो, मस्कारा यांची मागणी वाढत असून, जवळपास पूर्वपदावर आली आहे, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. थंडीमुळे मात्र लिपबामची मागणी कायम आहे.
चौकट :
४० टक्क्यांहून अधिक घट
लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतरही जवळपास दिवाळीपर्यंत कॉस्मेटिक्स व्यवसायात लक्षणीय घट झाली होती. मात्र, लग्नसराई सुरू झाली, तशी पुन्हा या व्यवसायाने उभारी धरली आहे. काजळ, आयशॅडो, आय लायनर या कॉस्मेटिक्सची मागणी आता पूर्वपदावर येत आहे; पण अजूनही लिपस्टिक, लिप ग्लॉस यांची विक्री घटलेलीच आहे. लिपस्टिक, लिप ग्लॉसच्या विक्रीत आजही ४० टक्क्यांहून अधिक घट आहे.
- नीलेश पटेल, व्यावसायिक