लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नवरात्र उत्सवानिमित्त पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व ठाण्यात महिला कर्मचारी व अधिकारी दिवसभरातील कामकाज पाहतील, असा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने हिंगोली शहर व ग्रामीण ठाणे व वसमत येथे महिला पोलीस अधिकाºयांनी अवैधदारूसाठा जप्त करून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.हिंगोली शहर ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोउपनि प्रेमलता गोमाशे तसेच ठाणे अंमलदार म्हणून मपोना शारदा ढेंबरे, गंगा सूर्यवंशी, अस्मिता उजगिरे, नंदा घोंगडे व पो.स्टे तपास पथकामध्ये मीरा बामणीकर, सविता ससाणे, सलमा शेख, मीना सावळे आदींची नियुक्ती केली होती. शनिवारी हिंगोली शहर येथे दारूबंदी कायद्याखाली कारवाई करून वाहनासह आरोपींकडील ४२ हजार ६९० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चिडीमार पथकाच्या सहा कारवाया करून रोडरोमिओंना चांगला चोप दिला. दिवसभरात दाखल होणारे सर्व प्रकरणे महिला अधिकारी व कर्मचाºयांनी चांगल्या प्रकारे हाताळले. तर ग्रामीण ठाणे अंतर्गत पीएसआय सुप्रिया केंद्रे यांनी हिंगोली-वाशिम रस्त्यावरील ढाबा येथे कारवाई करून दहा हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला. यावेळी महिला कर्मचारी प्रतिभा घुगे, प्रणिता मोरे यांच्यासह महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी सोबत होत्या. प्रभारी पो. अ. सुजाता पाटील यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले.वसमत: शहर पोलिसांच्या छापेमारीला वैतागलेल्या दारु विक्रेत्यांनी गावाबाहेरील विहिरीत दारूसाठा लपवला. शुक्रवारच्या महिला राजमधील ठाणेदार रुपाली कांबळे यांनी छापा मारुन तो साठा जप्त केला. महिला पोलिसांनी दोन जागी छापे मारून २६ हजार १६० रुपयांची अवैध दारु जप्त केली. छाप्यात प्रभारी ठाणेदार कांबळे, शेख हलीमा यांच्यासह महिला पोलीस कर्मचाºयांनी सहभाग नोंदवला.
महिला पोलीस अधिकाºयांची दबंग कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:55 PM