लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकांचा बिगुल तब्बल सात वर्षांनंतर वाजला आहे. निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात एकूण ४० जागांसाठी २९३ मतदार मतदान करतील. २० सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. २१ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येईल.औरंगाबाद महापालिकेतून १३ सदस्य निवडून येणार आहेत. त्यासाठी ५८ पुरुष, ५६ महिला असे एकण ११४ जण मतदान करतील. यासह जिल्हा परिषदेच्या २४ जागांसाठी ६२, तर सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, पैठण, गंगापूर आणि वैजापूर या नगरपालिका व परिषदेच्या ३ जागांसाठी ११६ मतदार मतदान करतील. या तिन्ही क्षेत्रांतील एकूण २९३ मतदार जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांची निवड करतील.या निवडणुकीसंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी मंगळवारी अंतिम मतदार यादी व निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली. यात २९ आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल.प्राप्त अर्जांची छाननी व अर्ज मागे घेतल्यानंतर १४ सप्टेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात करण्यात येईल.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुका २० रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:09 AM