गंगाराम आढाव , जालनायेथील डायट कार्यालयाच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी जिल्हा नियोजन समितीनेही (डीपीडीसी) डायट संस्थेने दाद मागितली होती. मात्र या समितीनेही रस्त्याचा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या चार वर्षांपासून डायट संस्था रस्त्याच्या प्रश्नासाठी शासनदरबारी अर्जफाटे करीत आहे. मात्र अद्याप त्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. वर्षभरापूर्वी शासनाने प्रशासकीय मान्यता देऊनही निधी न दिल्याने निधीअभावी प्रश्न प्रलंबित असल्याने डायट संस्थेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरदूत करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र तांत्रिक बाबी दाखवून जिल्हा नियोजन समितीने डायटचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे शासनाच्या अन्य कोणत्या योजनातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या दिशेने रस्ता तयार करावयाचा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून देण्यासाठी डायटने मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रस्त्याच्या मागणीसाठी व त्याकरिता लागणाऱ्या निधीसाठी आमच्या वरिष्ठ कार्यालयापासून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तसेच स्थानिक नेते, पालकमंत्री यांनाही या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली असल्याची माहिती डायटच्या प्राचार्या अचला जडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
‘डीपीडीसी’नेही प्रस्ताव फेटाळला
By admin | Published: March 15, 2016 12:14 AM