औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेसाठी आरआरसीसमोर सादरीकरणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेज २ मध्ये ऑनलाइन नावनोंदणी करून मुदतीत संशोधन अहवालाची प्रत विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागात सादर केली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार विद्याशाखेच्या ११ विषयांच्या विद्यार्थ्यांचे संशोधन व मान्यता समिती (आरआरसी) समोर १५, १६, १८ सप्टेंबर रोजी मुलाखती आणि सादरीकरण होणार आहे.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेंतर्गत १५ सप्टेंबर रोजी पर्यटनशास्त्र ६ उमेदवार, १६ सप्टेंबर रोजी वाणिज्य ४० उमेदवार, तर १८ सप्टेंबर रोजी वाणिज्य विभागाचे ४१ ते ७५ उमेदवार, मानव्य विज्ञान विद्याशाखा (भाषा) संस्कृत १५ सप्टेंबर रोजी १० उमेदवार, उर्दू १० उमेदवार, १८ सप्टेंबर रोजी हिंदी ३० उमेदवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १५ सप्टेंबर रोजी फुड टेक्नाॅलाॅजी विषयाचे १४ उमेदवार, १६ सप्टेंबर रोजी इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअरींग चे ४२ उमेदवार, १८ सप्टेंबर रोजी फार्मसीचे १ ते ६० उमेदवार, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अंतर्गत १५ सप्टेंबर रोजी ललीत कला २१ उमेदवार, नाट्यशास्त्र २६ उमेदवार यांचे आरआरसीसमोर सादरीकरण सकाळी साडे दहा ते साडेपाच वाजेदरम्यान विद्यापीठात होणार आहे.
हेही वाचा - - 'तोरण' बांधण्यास येणाऱ्या मुलाची आली मरणाची बातमी; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार- विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा