औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारापासून विभागापर्यंत सोडवण्यासाठी नाविण्यपुर्ण उपक्रम हाती घेत आहोत. विद्यापीठ व येथील निसर्गसुंदर परीसर विद्यार्थी, मान्यवरांना दाखवता यावा यासाठी दोन ओपन बस मार्च महिन्यापर्यंत सुरू करण्यात येईल. तसेच बाॅटनीकल गार्डन मधील कारंजे व इतर सोयीसुविधांची कामे पुढील आठ दिवसांत पुर्ण होऊन शालेय सहली पाठवण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना कळवणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
विद्यापीठातील बाॅटनिकल गार्डन एकेकाळी आकर्षणाचे केंद्र होते. मात्र, येथील कारंजे व देखभाल दुरूस्तीकडे कोरोना काळात काहीसे दुर्लक्ष झाले. मात्र, हे गार्डन शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी उपलब्ध करून देणार आहोत. सोनेरी महल, इतिहास वास्तूसंग्रहालय, बाॅटनिकल गार्डन अशी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली पाठवण्यासंदर्भात मनपा आयुक्त तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना कळवणार आहोत. विद्यार्थ्यांसीठी विद्यापीठाची बंद पडलेली विज्ञान बसही सुरू करत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी सशुल्क ओपन बस ही विद्यापीठ परीसर पाहण्यासाठी दर तासाला सेवा देईल. विभागांपर्यंत विद्यार्थ्यांना पोहचण्याचे साधनही ही असले. मार्च पर्यंत एक मोठी तर पाहुण्यांना परीसर दाखवण्यासाठी छोटी इलेक्ट्रीक बस मार्चपर्यंत खरेदी करून ही सेवा सुरू करू असेही कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.