औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ संशोधन प्रबंध डेटाबेससाठी २ हजार ५८५ शोधप्रबंध ‘अपलोड’ करून देशातील ‘टॉपटेन’ विद्यापीठांत स्थान मिळविले आहे, अशी माहिती ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘इन्फल्बिनेट’कडून शोधगंगा नावाचा पीएच.डी. प्रबंधाचा डेटाबेस विकसित करण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा असलेला पीएच.डी. थिसिस डेटाबेस आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय देशात ‘टॉपटेन’मध्ये
By admin | Published: July 01, 2016 12:28 AM