लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी परिषद सचिवपदासाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले. यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) युतीचा उमेदवार सचिन अंबादास हेमके यांनी दणदणीत विजय मिळविला. विद्यापीठाच्या अधिसभेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. एसएफआय संघटनेला मागील चार वर्षांपासून पदरी येत असलेली निराशा यावेळी संपुष्टात आली.यावर्षी सत्तेच्या जोरावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उमेदवारही निवडणुकीच्या आखाड्यात उतरला होता. मात्र, त्यांना युवासेनेपेक्षा अधिक मते घेता आली नाहीत, तर सम्यक विद्यार्थी आंदोलननेही प्रयत्न करीत निवडणूक रंगतदार करण्यास हातभार लावला. या निवडणुकीत एकूण ५१ मतांपैकी ५० मतदारांनी हक्क बजावला. यात युतीचा उमेदवार व व्यवस्थापनशास्त्र विभागाचा प्रतिनिधी सचिन हेमके याने तब्बल २४ मते मिळवत पहिल्याच फेरीत विजय मिळवला. युवासेनेच्या पूनम पाटीलला १२, ‘अभाविप’च्या विवेक पवार ८ आणि सम्यकचा उमेदवार नारायण खरात यास ५ मते मिळाली.विद्यापीठात वर्षअखेरीस विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्यामुळे सुरुवातीला कोणीही गांभीर्याने लक्ष घातले नाही. मात्र, विद्यार्थी संघटनांसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप सुरू केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एसएफआयच्या युतीला युवासेनेने तगडे आव्हान दिले होते. मागील दोन निवडणुकींत विद्यार्थी सेना-युवासेनेने बाजी मारली होती. त्यामुळे त्यांनी विभागाच्या प्रतिनिधींवर चांगलीच पकड मिळविली. मात्र, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एसएफआयने शेवटच्या टप्प्यात प्रतिष्ठा पणाला लावत एकतर्फी विजय मिळविला.सचिन हेमके यास प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान उपस्थित होते.विजयानंतर मिरवणूकराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एसएफआयच्या विजयानंतर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रशासकीय इमारत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत जोरदार मिरवणूक काढली. या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अभिजित देशमुख, युवक शहराध्यक्ष दत्ता भांगे, विद्यार्थी काँग्रेसचे मयूर सोनवणे, अमोल दांडगे, एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, नितीन वाव्हुळे, दीपक बहीर, यशोदीप पाटील, लोकेश कांबळे, सत्यजित मस्के, अभिमान भोसले, प्राजक्ता शेटे, प्रदीप सुरवसे, मनीषा मगरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक : राष्ट्रवादी-एसएफआयचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:08 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी परिषद सचिवपदासाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले. यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) युतीचा उमेदवार सचिन अंबादास हेमके यांनी दणदणीत विजय मिळविला. विद्यापीठाच्या अधिसभेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.
ठळक मुद्देसचिवपदी सचिन हेमके यांचा एकतर्फी विजय