शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार

By विजय सरवदे | Published: April 22, 2023 7:27 PM

बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची उभारणी केली. मात्र, आज या संस्थेचे अध्यक्षपद अनेक तुकड्यात विखुरले आहे. अध्यक्षपदाच्या ज्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका, तिचे पावित्र्य राखा, तेव्हाच मला दिलेल्या आजच्या या पुरस्काराचे चीज होईल, असे भावनिक आवाहन दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार यांनी आज येथे केले.मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी, २१ एप्रिल रोजी ज. वि. पवार यांना सन २०२२-२३ या वर्षाच्या ‘मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना ज. वि. पवार म्हणाले, बाबासाहेबांनी समाजाला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, हा मूलमंत्र दिला. पीईएसच्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज आणि या शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजासाठी उच्चशिक्षणाची दारे खुली केली. मिलिंद महाविद्यालय आणि मराठवाड्यावर बाबासाहेबांचे विशेष प्रेम होते. समाजातील मुलं शिकली, तर महत्त्वाच्या पदावर विराजमान होऊन समाजाचे भले करतील, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, या प्रदेशातील मुलांनी ‘मिलिंद’चा पाहिजे तेवढा लाभ घेतला नाही. यापुढे समाजातील उच्चशिक्षित असलेला आणि समाजाच्या प्रश्नांसाठी संघटन वाढवून संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला ‘पीईएस’च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करावे.

बाबासाहेबांची ही संस्था सरकारने ताब्यात द्यावी, यासाठी १९७६ मध्ये काही मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. ते आम्ही हाणून पाडले. त्यानंतर अलीकडे पीईएसचे अध्यक्षपद अनेक तुकड्यात विखुरले गेले. मलाही एका तुकड्यावर बसविण्यासाठी विचारणा झाली होती. पण, मी नम्रपणे नकार दिला. बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.

देश दुभंगण्याच्या वाटेवरसंविधानाच्या नावावर देश तोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला विरोध आणि समर्थन, असे थेट दोन प्रवाह आहेत. तुम्ही समाजातील ‘क्रीम’ आहात. जास्तीत जास्त लाेकांना संविधानाची बाजू समजून सांगा. लोकांना संविधानाच्या बाजूने उभे करा आणि देश दुभंगणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन ज. वि. पवार यांनी केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वनAurangabadऔरंगाबाद