ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. १४ : सिडको विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले.
डॉ. नागनाथ कोडे यांची १९८७ साली पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाली. त्यांनी उस्मानाबाद, बीड, नांदेड व औरंगाबाद या ठिकाणी सेवा बजावली आहे. नांदेडला पोलीस निरीक्षक पदी असताना त्यांनी एलएलबी , एमबीए या पदव्या प्राप्त केल्या. तसेच त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कायदा या विद्या शाखेत पीएचडी प्रदान केली आहे. या सोबतच त्यांनी " प्रेमाचे फुल आणि एकच मुल" हे तीन अंकी नाटकही लिहिले आहे. सध्या ते छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. में- २०१७ मध्ये त्यांना विशेष कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
यासोबतच भारत बटालियनचे समादेशक निसार तांबोळी यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली आहे.