शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

'फिल्म तयार, रिलीज होणे बाकी'; पुराव्यासाठी पोलिसांनी एन २ येथील विहिरीवर ठाण मांडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 10:39 AM

Dr. Rajan Shinde Murder Case : डॉ. शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अतिशय बारकाईने काही पुरावे गोळा केले आहेत.

ठळक मुद्दे विहिरीतून शस्त्र बाहेर काढल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

औरंगाबाद : प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी शहर पोलिसांनी अगोदर ठोस पुरावे हस्तगत करण्यावर जोर दिला असल्याचे रविवारी दिसून आले. आरोपींनी हत्या केल्यानंतर शस्त्रे टाकलेल्या विहिरीवर शहरातील टॉपचे पोलीस अधिकारी दिवसभर ठांण मांडून होते. विहिरीतील पाणी उपसण्यात आले. पण सायंकाळ झाल्यामुळे गाळ काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. यातच शनिवारी मध्यरात्री पाऊस झाल्यामुळे विहिरीतील पाणीसाठा वाढला. त्यामुळेही विलंब झाला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

डॉ. शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अतिशय बारकाईने काही पुरावे गोळा केले आहेत. त्यासाठी विविध पथके तैनात केली होती. त्याची सुयोग्य मांडणी केली असून, विहिरीतून शस्त्र बाहेर काढल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. शनिवारी रात्रभर पाणी उपसण्यात येत होते. मध्यरात्रीनंतर पाऊस आल्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. तसेच पाण्याचा उपसा झाल्यामुळेही विहिरीचे झरे रिकामे झाले. त्यामुळे विहिरीचा पाणीसाठा वाढला. रविवारी सकाळीच ७.४५ वाजताच तपासी अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव यांनी पाणी उपसत असलेल्या विहिरीची पाहणी केली. तेव्हापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते गुन्हे शाखेच्या विविध अधिकाऱ्यांसह विहिरीवर बसूनच होते. पोलीस निरीक्षक गीता बागवडे, गौतम पातारे यांच्यासह उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनीही विहिरीची पाहणी केली.

पोलिसांच्या विविध पथकांनी डॉ. शिंदे यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात यश मिळवले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पुरावेही जमा केले. त्यानुसार आरोपीला सध्याच्या परिस्थितीत अटक केल्यानंतर तांत्रिक मुद्याच्या आधारावर तो एक दिवसात जामीन मिळू शकतो. हा धोका ओळखून आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटू नये, यासाठी पोलीस सज्जड पुरावे जमा करीत आहेत. पोलिसांनी तयार केलेल्या सर्व घटनाक्रमातील महत्त्वाचा धागा हत्येसाठी वापरलेले शस्त्र असून, ते मिळविण्यासाठीच ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका पोलिसांनी घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अफवांचा बाजार वेगातखुनाच्या अनुषंगाने समाजमाध्यमात विविध अफवा पसरविण्यात येत होत्या. संशयिताने एन २ येथील विहिरीत शस्त्र टाकल्याचा जबाब बदलला असून, एन ७ येथील विहिरीत शस्त्र टाकल्याचे नव्याने सांगितले, अशी अफवा रविवारी सकाळी पसरली होती. सगळीकडे फोनाफाेनी करण्यात येत होती; मात्र पोलिसांच्या सर्व पथकांनी एन २ येथील विहिरीच्या पाणी उपशावर लक्ष केंद्रित केले. तसेच एन ७ येथील विहिरीची अफवाच असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

फिल्म तयार, रिलीज होणे बाकीडॉ. शिंदे यांचा खून कसा केला. कशामुळे केला. या खुनाच्या पूर्वी काही प्रयत्न झाले का. खून केल्यानंतर त्याची दिशा बदलण्यासाठी कोणत्या क्लुप्त्या केल्या, याची इत्यंभूत माहिती सुसूत्रीतपणे पोलिसांनी जोडली आहे. त्यासाठी लागणारे पुरावे, कागदोपत्री जबाब नोंदविण्यात आले आहेत. या खून प्रकरणाची पूर्ण फिल्म तयार झालेली असून, रिलीज होण्यासाठी विहिरीतून शस्त्र बाहेर काढण्याचाच अवकाश आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

...तर खटला ऐतिहासिक होणारडॉ. शिंदे खून प्रकरणात पोलीस तपासामध्ये आतापर्यंत एकच संशयित निष्पन्न झालेला आहे. त्या संशयिताला कायद्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे. या संशयितांची सर्व कुंडलीच पोलिसांनी हस्तगत केली आहे. हा संशयित मागील अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर काय सर्च करतो, वर्तवणूक कशी होती, शाळा, विद्यापीठातील त्याचे रेकॉर्ड काय आहे याची इत्यंभूत माहिती जमा करण्यात आली आहे. देशभर गाजलेल्या आणि कायद्याला आव्हान दिलेल्या दिल्लीतील निर्भया खटल्याप्रमाणे या खुनाच्या घटनेत क्रूरता भरलेली आहे. त्या दृष्टीने पोलीस तयारी करीत आहेत. विहिरीत शस्त्र मिळाल्यास खटला ऐतिहासिक होणार असल्याचा दावाही पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद