शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Dr. Rajan Shinde Murder : डोक्यात घातलेले डंबेल, रक्त पुसलेले टॉवेल विहिरीत सापडले, चाकूचा शोध सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 10:49 AM

Dr. Rajan Shinde Murder : पोलिसांनी तयार केलेल्या सर्व घटनाक्रमातील महत्त्वाचा धागा हत्येसाठी वापरलेले शस्त्र होते.

औरंगाबाद : राज्यभर गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे खून ( Dr. Rajan Shinde Murder ) प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांना खुनासाठी वापरलेले संशयित शस्त्र डंबेल आणि रक्त पुसण्यासाठी वापरलेली टॉवेल विहिरीत सापडले ( Dumbbells, blood-stained towel found in well) . धारदार शास्त्राचा शोध सुरु आहे. डॉ. शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अतिशय बारकाईने काही पुरावे गोळा केले आहेत. त्यासाठी विविध पथके तैनात केली होती. त्याची सुयोग्य मांडणी केली असून, विहिरीतून सर्व शस्त्र बाहेर काढल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

पोलिसांनी तयार केलेल्या सर्व घटनाक्रमातील महत्त्वाचा धागा हत्येसाठी वापरलेले शस्त्र होते. यामुळे आरोपींनी हत्या केल्यानंतर शस्त्रे टाकलेल्या विहिरीवर शहरातील टॉपचे पोलीस अधिकारी दिवसभर ठांण मांडून होते. विहिरीतील पाणी उपसण्यात आले. पण सायंकाळ झाल्यामुळे गाळ काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. यातच पाऊस झाल्यामुळे विहिरीतील पाणीसाठा वाढला. त्यामुळेही विलंब झाला. मात्र आज सकाळी पोलिसांना खुनासाठी वापरले संशयित डंबेल आणि रक्त पुसलेले टॉवेल सापडले आहे. पोलीस चाकूचा शोध घेत आहेत. सर्व शस्त्र मिळाल्यानंतर पंचानामा करून आरोपीस ताब्यात घेण्यात येणार आहे. यामुळे अत्यंत गुंतागुतीच्या या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

खटला ऐतिहासिक होणारडॉ. शिंदे खून प्रकरणात पोलीस तपासामध्ये आतापर्यंत एकच संशयित निष्पन्न झालेला आहे. त्या संशयिताला कायद्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे. या संशयितांची सर्व कुंडलीच पोलिसांनी हस्तगत केली आहे. हा संशयित मागील अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर काय सर्च करतो, वर्तवणूक कशी होती, शाळा, विद्यापीठातील त्याचे रेकॉर्ड काय आहे याची इत्यंभूत माहिती जमा करण्यात आली आहे. देशभर गाजलेल्या आणि कायद्याला आव्हान दिलेल्या दिल्लीतील निर्भया खटल्याप्रमाणे या खुनाच्या घटनेत क्रूरता भरलेली आहे. त्या दृष्टीने पोलीस तयारी करीत आहेत. विहिरीत शस्त्र मिळाल्यास खटला ऐतिहासिक होणार असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद